मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#EB3
#W3
#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook

#मटार पॅटीस....
बटाट्याच्या कुशीत पहुडलेलं मटाराचं सारण..आणि वरुन पोह्याच्या पावडरीची घट्ट चादर लपेटून थंडीपासून दूर पळत गरम तेलात अंघोळ करुन खमंग सोनेरी रुपडं घेऊन जेव्हां आपल्या समोर अवतरतात तेव्हां तो खमंग वास,ते रुप पाहताच * ती पाहताच बाला..कलेजा खलास झाला*..अशी परिस्थिती होऊन भल्या भल्यांच्या रसनेची दाणादाण उडते आणि पोटातल्या जठराग्नीला शांत करण्यासाठी एका पाठोपाठ एक मटार पॅटीसच्या कित्येक आहुत्या पडतात हे कळत देखील नाही..😜
काय म्हणताय..वाचूनच तुमचा पण जठराग्नी खवळलाय..😀 थांबा थांबा..तुमच्या जठराग्नीला शांत कसे करता येईल त्याचे उत्तर माझ्या रेसिपीत दडलंय..चला तर मग रेसिपी वाचायला घ्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनीटेे
4जणांना
  1. 7-8 उकडलेले बटाटे
  2. 1/2 किलोताजा मटार
  3. 6-7हिरव्या मिरच्या
  4. 2 इंचआल्याचे तुकडे
  5. भरपूर कोथिंबीर
  6. 2 कपजाड पोहे
  7. 1 टीस्पूनजीरे पावडर
  8. 1 टेबलस्पूनधने पावडर
  9. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  10. मीठ चवीनुसार
  11. फोडणीसाठी तेल जीरे
  12. टोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

40-50 मिनीटेे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करा. मटार मध्ये थोडे मीठ आणि साखर घालून मटार उकडून घ्या. चार ते पाच मिरच्या आणि एक इंच आले थोडी कोथिंबीर यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या

  2. 2

    जाड पोहे मिक्सर वर जाडसर दळून घ्या. एकदम बारीक पूड करायची नाहीये. उकडलेले बटाटे साल काढून किसणीवर किसून घ्या. नंतर यामध्ये मिक्सर वर बारीक केलेले पोहे घाला. चवीनुसार मीठ घालून गोळा मळून ठेवा.

  3. 3

    आता उकडलेले मटार चाळणी मध्ये घालून ठेवा. एका कढई मध्ये तेल जीरे हिरव्या मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे थोडी कोथिंबीर घालून खमंग फोडणी करून घ्या आणि यामध्ये उकडलेले मटार घालून परतून घ्या या नंतर मिरची आलं पेस्ट,सर्व मसाले घालून एकदा व्यवस्थित एकजीव करा.आता यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून एक वाफ आणा.

  4. 4

    हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्या.आता बटाट्याची पारी करून त्यामध्ये ही जी मिश्रणाची भरड काढली आहे ती एक चमचा भरून पारी बंद करा आणि पोह्याच्या पावडरीमध्ये घोळून गरम तेलात तळून घ्या.

  5. 5

    तयार झाले आपले खमंग खरपूस सोनेरी रंगाचे गरमागरम मटार पॅटीस... हे पॅटीस एका डिश मध्ये घालून सॉसबरोबर सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes