डाळ तांदळाचा ढोकळा (dal tandlacha dhokla recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

डाळ तांदळाचा ढोकळा (dal tandlacha dhokla recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
तेरा घटक
  1. 1 वाटीचना डाळ
  2. 1 वाटीतांदूळ
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 4-5 कढीपत्त्याची पाणी
  8. 3-4 टेबलस्पून तेल
  9. प्रमाणात मीठ
  10. प्रमाणात साखर
  11. 1इनो चा पॅकेट
  12. चिमुटभरहिंग
  13. किंचीत हळद

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास भिजत ठेवले. त्यानंतर त्यातील पाणी निथळून घेतले. मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ-तांदूळ,हिरवी मिरची, कोथिंबीर, जीर आलं बारीक वाटून घेतली

  2. 2

    डाळ तांदळाची पेस्ट चार ते पाच तास फॉर्मेट करण्याकरिता ठेवली. या पेस्टमध्ये किंचीत हळद,हिंग, तेल, साखर प्रमाणात मीठ घालून फेटून घेतले.

  3. 3

    गॅसवर कढईत स्टॅन्ड ठेवून पाणी तापायला ठेवले. एका ताटाला तेल लावून करून घेतले. ढोकळा च्या मिश्रणामध्ये इनो घालून फेटून ताटा मध्ये घालून वीस मिनिटा करता स्टीम करायला ठेवले.

  4. 4

    कढईमध्ये तेल तापवून मोहरी, कढीपत्ता हिरवी मिरची घालून तडका तयार करून घेतला. हा तडका ढोकळ्यावर पसरुन घेतला आणि वरून कोथिंबीर घातली.

  5. 5

    तयार आहे आपला गरमागरम डाळ आणि तांदळाचा ढोकळा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

Similar Recipes