मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#cpm8 week- 8
पौष्टिक असा ढोकळा.
यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही.

मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)

#cpm8 week- 8
पौष्टिक असा ढोकळा.
यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 1/4 कपतांदूळ
  2. 2 टेबलस्पूनउडीद डाळ
  3. 2 टेबलस्पूनमूग डाळ
  4. 2 टेबलस्पूनहरबरा डाळ
  5. 1/4 कपपोहे
  6. 2-3हिरव्या मिरच्या
  7. 6-7लसूण पाकळ्या
  8. रंग येण्यापुरती हळद
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. फोडणीचे साहित्य
  11. 1 टीस्पूनतेल
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 1/4 टीस्पूनहिंग
  14. 2हिरव्या मिरच्या
  15. 1 टीस्पूनतीळ
  16. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    सर्व डाळी 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेणे व पाणी घालून 5-6 तास भिजत ठेवावी.

  2. 2

    पोहे पाण्याने भिजवून घेणे. भिजत ठेवायचे नाही. डाळी पाण्यातून निथळून घेणे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळी,पोहे व थोडे पाणी घालून वाटून घेणे. वाटण एका मोठ्या पातेल्यात काढून घेणे. झाकण ठेवून रात्रभर ठेवावे.

  3. 3

    सकाळी पीठ फुगलेले दिसेल. त्यात रंग येण्यापुरती हळद, हिरव्या मिरच्या व लसूण यांची पेस्ट करून घेणे व मीठ घालून मिक्स करून घेणे.

  4. 4

    कढईत पाणी गरम करत ठेवावे. त्यात एक स्टॅन्ड ठेवणे. कुकरच्या डब्याला तेल लावून घेणे. त्यात मिश्रण घालून घेणे. डबा 2-3 वेळा टॅप करून घेणे, म्हणजे त्यातील हवा निघून जाईल.

  5. 5

    तो डबा कढईत ठेवून,वरून झाकण ठेऊन 15-20 मिनिटे शिजवून घेणे. टूथपिकने शिजला का नाही हे पाहावे.शिजला की गॅस बंद करावा.

  6. 6

    डबा बाहेर काढून, थंड होऊ द्यावे.सुरीने वडया करून घेणे. फोडणीच्या कढईत तेल गरम करत ठेवावे.तेल तापले की, त्यात मोहरी, हिंग, मिरचीचे तुकडे व तीळ घालून चमच्याने हलवावे. गॅस बंद करावा. ही फोडणी ढोकळयावर घालून घेणे व थोडी कोथिंबीर वरून घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes