कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मीनीट
  1. गव्हाची कणीक आवश्यकते नूसार
  2. 1 वाटीएकदम बारिक चिरलेला कोबी
  3. 1 चमचेखिसलेलआल,लसूण
  4. 1/2 चमचाओवा
  5. 1/2 चमचामैगी मसाला (असेेेल तर)
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट चविनूसार
  7. मीठ चवी नुसार
  8. कोथींबीर आवडी नुसार
  9. 1/2 चमचातेल

कुकिंग सूचना

30 मीनीट
  1. 1

    गैस वर कढईमध्ये तेलात आल,लसूण,मैगी मसाला,लाल तिखट,ओवा घालुन छान फोडणीझाली की मग बारिक चिरलेला कोबी घाला व चवीनुसार मीठ आणी सतत हलवत रहा जेणेकरुन कोबी कढईला चिकटनार नाही कोबी थोडा नरम झाला की लगेच एका डिश मधे थंड होण्यासाठी ठेवा. (कोबी जास्त शिजवलेला नसावा)

  2. 2

    कोबी थंड झाला की तयार कणकेचा छोट्या गोळ्याची पारी बनवा आणी कोबी त्यात भरा आणी छान हलकेच लाटून घ्या.

  3. 3

    लाटलेला पराठा तव्यावर दोन्हिबाजुने छान खरपूस भाजुन घ्या. आणी हव्यात्या आकारात काप दया जेणेकरुन लहान मुलं पहताक्षणी खातील.

  4. 4

    तयार पराठा कोणत्याही सुक्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes