शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. ५० ग्रॅम सुकी बेडगी मिरची
  2. 1फळी तेल
  3. 2 टेबलस्पूनआल बारीक तुकडे
  4. 2 टेबलस्पूनलसूण अगदी बारीक तुकडे चिरलेले
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर च्या काड्या बारीक चिरलेल्या
  6. 1 टेबलस्पूनकॉर्न फ्लावर
  7. आवश्यक ते नुसारपाणी
  8. चविनुसारमीठ
  9. 1 टेबलस्पूनसाखर
  10. 1 टीस्पूनसायट्रिक ऍसिड
  11. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  12. 1 टेबलस्पूनमिरेपूड

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    सर्वप्रथम एका पातेलंत्यात २ ग्लास पाणी उकळून, त्यात भिजवलेल्या बेडग्या मिरच्या घालून ५ मिनिटे उकळून घ्यावे व नंतर पाण्यातून काढून मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ओबडधोबड बारीक करून घ्यावी. व नंतर

  2. 2

    गॅस वर एक पॅन मध्ये तेल घाला, तेल गरम झाले की, त्यात बारीक चिरलेला लसूण घालून तीन ते चार मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेलं अाल घालावे, २ मिनिटं परतून घ्या. नंतर त्यात कोथिंबिरीच्या काड्या घालून एक मिनिटे शिजवून घ्यावे.
    यामध्ये बारीक केलेली मिरचीची पेस्ट घालून दोन ते तीन मिनिटे शिजवून द्याव व नंतर त्यामध्ये मीठ, साखर, मिरेपूड व सायट्रिक ऍसिड घालून, मिक्स करून,सोया सॉस घालावे, नंतर तपाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवून द्याव े.

  3. 3

    व नंतर एका वाटीत टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर घेऊन, त्यात थोडे पाणी टाकून, त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आणि ही पेस्ट तयार केलेल्या चटणी मध्ये हळूहळू चमचाने मिक्स करूनदोन मिनिटे शिजवून घ्यावी.
    तयार आहे आपली शेजवान चटणी
    👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes