मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

माझी फेवरेट रेसिपी .मी नेहमी करते .
#EB8 #W8

मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)

माझी फेवरेट रेसिपी .मी नेहमी करते .
#EB8 #W8

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 लोक
  1. 1 वाटीमोड आलेली मटकी
  2. 2चिरलेले बारीक कांदे
  3. 2 टोमॅटो
  4. 1 चमचा आले लसूण पेस्ट
  5. 2 पळी तेल
  6. 1/2 चमचा जीरे
  7. 1/2 चमचा मोहरी
  8. 5-6 कडीपत्ता पाने
  9. 1 हिरवी मिरची
  10. 2 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  11. 1/2 टेबलस्पूनहळद
  12. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  13. चिरलेली कोथिंबीर
  14. 1 टेबलस्पून धना पावडर
  15. चवीनुसार मीठ
  16. गरजे नुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम मटकी स्वच्छ धुवून घ्या.त्यानंतर एका कढईत अर्धा पळी तेल टाकून मटकी तीन ते चार मिनिटे फ्राय करून घ्या. व नंतर मीठ व चिमुटभर हळद टाकून मिक्स करा. व अर्धा ग्लास पाणी टाकून पाच मिनिटे शिजवून घ्या.

  2. 2

    दोन टोमॅटो ची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या. गॅस वर एक कढई ठेवा. व त्यामध्ये दोन पळी तेल टाकून जीरे,मोहरी,कडीपत्ता,हिरवी मिरची ची फोडणी द्या. त्या नंतर कांदा टाकून लालसर भाजून घ्या.

  3. 3

    कांदा लालसर भाजून झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट व टोमॅटो पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घ्या व नंतर त्यात कांदा लसूण मसाला,चिमुटभर हळद,मीठ,धने पावडर टाकून चांगले परतून घ्या. व थोडेसे पाणी टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.

  4. 4

    मसाला चांगला भाजून झाल्यानंतर शिजवलेली मटकी टाकून चांगले मिक्स करून घ्या व त्यात गरजे नुसार पाणी व चिरलेली कोथिंबीर टाकून उकळी येऊ द्या.मटकी ची उसळ तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes