तंदुरी आलू (Tandoori Aloo recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

तंदुरी आलू (Tandoori Aloo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-३५ मिनीटे
४ जणांसाठी
  1. मॅरीनेशन साहित्य:
  2. 1 टेबलस्पूनराईचे तेल
  3. 2 टेबलस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  4. 1 टेबलस्पूनधणे पावडर
  5. 1 टीस्पूनजीरे पावडर
  6. 1 टीस्पूनकाळे मीठ
  7. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  8. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  11. 4 टेबलस्पूनघट्ट दही
  12. चवीनुसारमीठ
  13. इतर साहित्य:
  14. 5-6मध्यम बटाटे (चौकोनी तुकडे)
  15. ५०० मि. ली. पाणी
  16. 1 कपसिमला मिरची (चौकोनी तुकडे)
  17. 1 कपकांदा (चौकोनी तुकडे)
  18. २-४ तुकडे कोळश्याचे
  19. 2-3 टेबलस्पूनतुप
  20. बटर
  21. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३०-३५ मिनीटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात पाणी गरम करुन त्यात थोडे मीठ घालून, एक उकळी आल्यावर बटाटे घालून ८०% शिजवून घ्यावे आणि जाळीवर थंड करण्यासाठी ठेवावे.

    दुसरीकडे मॅरीनेशन साहित्य एकत्र करुन तयार ठेवावे.

  2. 2

    मॅरीनेशन पेस्टमध्ये बटाटे, सिमला मिरची आणि कांदा यांचे तुकडे घालून नीट मिक्स करुन कोटींग करावे.

  3. 3

    आता या मिश्रणावर, एका वाटीत गरम कोळश्याचे तुकडे आणि त्यावर १ चमचा तुप घालून मिश्रण ५-७ मिनीटे झाकून ठेवावे.
    यामुळे कोळश्याचा अॅरोमा मिश्रणात मिसळून स्मोकी फ्लेवर येईल.

  4. 4

    नंतर एका टिक्का राॅडवर सिमला मिरची- कांदा - बटाटा असा सिक्वेन्स करत रॉड तयार करावे.

  5. 5

    तयार रॉड एका पसरट तव्यावर तुप गरम करुन मध्यम- मोठ्या आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे.

    वर बटर लावून थोडावेळ डायरेक्ट गॅसवर भाजावे.

  6. 6

    तयार तंदुरी आलू एका बाऊलमध्ये काढून त्यात चिरलेला कांदा, चाट मसाला, पुदीना चटणी, चिंच-खजूर चटणी, थोडा लिंबू रस आणि कोथिंबीर मिक्स करुन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

Similar Recipes