वड्या वांग्याची भाजी (vdya vangyachi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#भाजी... संध्याकाळच्या वेळी, जेव्हा काय करायचा, असा प्रश्न पडतो, तेव्हा, ग्रामीण भागात, हमखास ही भाजी करतात, मी त्यात आवडीनुसार, बटाटाही घातला आहे... मस्त रस्सेदार भाजी, मस्त जेवण होत.... सोबत, कांदा आणि लिंबू...

वड्या वांग्याची भाजी (vdya vangyachi bhaji recipe in marathi)

#भाजी... संध्याकाळच्या वेळी, जेव्हा काय करायचा, असा प्रश्न पडतो, तेव्हा, ग्रामीण भागात, हमखास ही भाजी करतात, मी त्यात आवडीनुसार, बटाटाही घातला आहे... मस्त रस्सेदार भाजी, मस्त जेवण होत.... सोबत, कांदा आणि लिंबू...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपमूग वड्या
  2. 1वांगे
  3. 1उकडलेला बटाटा
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  6. 1कांदा बारीक चिरून
  7. 1हिरवी मिरची
  8. कडीपत्ता
  9. 1मोठे टोमॅटो बारीक चिरून
  10. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  11. 1 टीस्पूनधणे पूड
  12. 1 टीस्पूनमॅगी मसाला
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1 टेबलस्पूनतिखट
  15. चवीनुसारतिखट
  16. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  17. कोथिंबीर
  18. पाणी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    मूग वड्या जाडसर कुटून घ्याव्यात. वांगे, टोमॅटो, कांदा चिरून घ्यावे. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घ्याव्यात.

  2. 2

    गॅसवर एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाकावी. हिरवी मिरची, कढीपत्ता, आणि कांदा टाकावा. आले लसूण पेस्ट टाकून, चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो टाकावे. थोडे सॉफ्ट झाले, की त्यात बटाटा टाकावा. किंचित परतल्यावर त्यात, हळद, तिखट, धणे पूड आणि मसाला टाकावा.

  3. 3

    चांगले मिक्स केल्यावर, बारीक केलेल्या वड्या टाकून परतून घ्यावे. वांगे टाकून, नंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकावे. टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालावे. आणि झाकण ठेवून शिजू द्यावे.

  4. 4

    पाहिजे त्या प्रमाणात रस्सा घट्ट झाला, आणि वड्या शिजल्याची खात्री पटली की गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर टाकावी. गरमागरम वड्या वांग्याची रस्सेदार भाजी, पोळी किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी तयार आहे. आमच्या कडे, अशी भाजी असली, की मस्त काला करून जेवण होत, भरपेट. सोबत, कांदा आणि लिंबू असेल, की😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes