कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ट्रेंडिंग रेसिपी
कोबीची भाजी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळी करतात.
मी आज कोबी ची भाजी बटाटा घालून केली व त्यात मॅगी मसाला घातला त्यामुळे कोबीच्या भाजीची चव खूप छान लागते😀

कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी
कोबीची भाजी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळी करतात.
मी आज कोबी ची भाजी बटाटा घालून केली व त्यात मॅगी मसाला घातला त्यामुळे कोबीच्या भाजीची चव खूप छान लागते😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15ते20 मिनिटे
चार ते पाच
  1. 1मध्यम आकाराचा पूर्ण पत्ताकोबी
  2. 1बटाटा
  3. 2हिरवी मिरची
  4. 6-7लसणाच्या पाकळ्या
  5. 1/2 इंचअद्रकाचा तुकडा
  6. 1 टेबलस्पूनमोहरी
  7. 1 टेबलस्पूनजीरे
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 1 टेबलस्पूनहळद पावडर
  10. 1 टेबलस्पूनधना जिरा पावडर
  11. 1-1.5 टेबलस्पून लाल तिखट
  12. मॅगी मसाला
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

15ते20 मिनिटे
  1. 1

    प्रथम पत्ता कोबी व बटाटा बारीक चिरून घ्यावे

  2. 2

    नंतर एक भांडे घेऊन ते गॅसवर ठेवावे त्यात तेल घालून घ्यावे तेल तापले की जीरे मोहरी घालून घ्यावे अद्रक लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यावी जीरे तडतडले की त्यात हे पेस्ट घालून घ्यावी नंतर त्यात सर्व मसाले घालून घ्यावे

  3. 3

    मसाले दोन मिनिटे तेलात होऊ द्यावे नंतर त्यात चिरलेला बटाटा घालून घ्यावा पाच मिनिटं वाफेवर होऊ द्यावा बटाटा थोडा शिजला कि त्यात चिरलेली कोबी घालून घ्यावी

  4. 4

    कोबी घातल्यानंतर सर्व हलवून घ्यावे मॅगी मसाला घालून घ्यावा दहा ते बारा मिनिट ताटली ठेवून वाफेवर भाजी होऊ द्यावी मॅगी मसाला घातला की कोबीच्या भाजीची चव खूप छान लागते

  5. 5

    छान कोबीची भाजी तयार झाली वरतून र्कोथिंबीर घालून पोळीसोबत किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes