मुगाच्या वड्यांची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap # माधुरी वाटेकर # बटाटा टाकून पहील्यांदाच केली आहे मी मुगाच्या वड्यांची भाजी.. छान झाली आहे.. धन्यवाद..

मुगाच्या वड्यांची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)

#cooksnap # माधुरी वाटेकर # बटाटा टाकून पहील्यांदाच केली आहे मी मुगाच्या वड्यांची भाजी.. छान झाली आहे.. धन्यवाद..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमुगाच्या वड्या
  2. 1बटाटा
  3. 1मोठा कांदा चिरून
  4. 2टोमॅटो
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1-1/2 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनधणे पूड
  11. 1/2 टीस्पूनमसाला
  12. चवीनुसारमीठ
  13. थोडासागुळ
  14. 1-1.5 ग्लास पाणी गरम
  15. कोथिंबीर

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावी. कांदा, टोमॅटो, बटाटा सोलून, चिरून घ्यावे. वड्या थोड्या जाडसर कुटून घ्याव्यात.

  2. 2

    आता एका कढईत अर्धा चमचा तेल घालून कुटलेल्या वड्या, किंचित परतून घ्याव्यात. आणि बाजूला काढून घ्याव्यात.

  3. 3

    आता त्याच कढईत उरलेले तेल टाकून, मोहरी टाकून ती फुटल्यावर कांदा टाकावा. किंचित सोनेरी रंगावर आला की त्यात आले लसूण पेस्ट टाकावी. हळद, तिखट, धणे पूड आणि मसाला टाकावा.

  4. 4

    चांगले मिक्स करून नंतर त्यात टोमॅटो टाकावे. दोन मिनिट शिजवावे. त्यानंतर त्यात चिरलेला बटाटा, आणि वड्या टाकाव्यात मीठ टाकावे.

  5. 5

    मिक्स करून नंतर त्यावर झाकण ठेवून 2 मिनिट वाफ आणावी. आता त्यात गरम पाणी टाकावे. गुळ टाकावा. आणि झाकण ठेवून चार पाच मिनिट शिजवावे.

  6. 6

    आता भाजी शिजल्यची खात्री करून गॅस बंद करावा. चिरलेली कोथिंबीर घातली, की जेवणासाठी भाजी तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (3)

Similar Recipes