गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ नग
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनतूप
  3. 1टिस्पून साखर
  4. चवीनुसारमीठ
  5. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  6. 1 टीस्पूनइंस्टंट ईस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    गव्हाच्या पिठामध्ये साखर, मीठ, ईस्ट, तूप आणि मिल्क पावडर घालून सैल गोळा बनवून घ्या...

  2. 2

    वरून थोडं तेल किंवा तूप घालून पिठाचा गोळा पंधरा मिनिटं किंवा स्मुथ टेक्स्चर मिळेपर्यंत मळून घ्या... पिठाचा गोळा हातात धरल्यानंतर गळायला हवा एवढं सैल पीठ मळा, रोटी छान सॉफ्ट होते... पीठ घट्ट असेल तर रोटी भाजल्यानंतर खूप ड्राय होते...

  3. 3

    पिठाचा गोळा एका मोठ्या भांड्यात घालून वरून प्लॅस्टिक क्लींग रॅपने झाकून दोन तास राईझ होण्यासाठी ठेवा...

  4. 4

    दोन तासानंतर पिठाचा गोळा दुपटीहून जास्त फुलून येतो...

  5. 5

    पीठ पंक्चर करून पुन्हा एकदा मळुन घ्या... आधी व्यवस्थित मळले गेले असेल तर ह्या स्टेजला पीठ हाताला अजिबात चिकटत नाही... एक कप पिठामध्ये तीन ते चार रोटी बनतात...

  6. 6

    रोटी व्यवस्थित लाटून घेऊन एका बाजूला पाण्याने संपूर्ण ओली करून घ्या...

  7. 7

    तंदुरी रोटी भाजण्यासाठी थोडं खोल भांड घ्या... हे भांड नॉन स्टिक नसावं, नाहीतर आपली रोटी पॅनला चिकटणार नाही... पाणी लावलेली बाजू तव्यावर घाला की रोटी तव्यावर चिकटेल, व्यवस्थित शिजू द्या... खालची बाजू शिजल्यानंतर पॅन डायरेक्ट फ्लेमवर उलटा करा... मध्ये मध्ये चेक करून रोटी व्यवस्थित भाजून घ्या...

  8. 8

    तयार रोटी चमच्याच्या सहाय्याने तव्या पासून वेगळी करा...

  9. 9

    ह्या रोटी ला वरून बटर लावले की बटर रोटी तयार...

  10. 10

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी तुमचा आवडत्या ग्रेव्ही जोडीला गरम गरम सर्व्ह करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes