गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपशिजवलेला भात
  2. 3गावरान कच्ची टोमॅटो
  3. 1पिकलेले लाल टोमॅटो
  4. 7 ते आठ लसून पाकळ्या
  5. 1 इंचआलं
  6. 4मोठे पाती कांदे/दोन मध्यम कांदे
  7. 1हिरवी मिरची
  8. 7 ते आठ कडीपत्ता पाने
  9. आवश्यकतेनुसार तेल
  10. 1 टेबलस्पूनरंगाचे लाल तिखट
  11. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  12. 1 टीस्पूनमिक्स मसाला
  13. 1 टीस्पूनहळद
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टीस्पून साखर
  16. 2 टेबलस्पूनटोमॅटो केचप

कुकिंग सूचना

  1. 1

    पिकलेले टोमॅटो आणि आलं मिक्सरमध्ये वाटून घ्यावे... कच्चा टोमॅटो पैकी दोन टोमॅटो बारीक चिरून व एका टोमॅटोच्या लांब चीरा कराव्यात... लसूण बारीक चिरून घ्यावा... भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात लसुण करपे पर्यंत परतून घ्यावा... मग त्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परतावे... कांदा घालून सॉफ्ट होई पर्यंत परता... मग सर्व मसाले आणि मीठ घालून परता...

  2. 2

    वरील मिश्रणात वाटलेले टोमॅटो घालून तीन ते चार मिनिटे परता... मग बारीक चिरलेलं कच्चा टोमॅटो आणि कांद्याची पात घालून तेल सुटेपर्यंत शिजवा... गावरान टोमॅटो शिजल्यानंतर ही लगदा होत नाहीत... त्याचं एक छान टेक्स्चर टोमॅटो राईसला येतं... मग त्यात टोमॅटो केचप, साखर आणि लांब चिरलेला कच्चा टोमॅटो घाला... हे टोमॅटो जास्त शिजवायच नाही... थोडा कच्चेपणा ठेवावा...

  3. 3

    सर्व व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यात शिजवलेला भात सुटा करून घालावा... भात व्यवस्थित मिसळून झाकण ठेवून एक वाफ काढावी...

  4. 4

    आपलं गावरान टोमॅटोच राईस खाण्यासाठी तयार आहे... थंडीच्या दिवसांमध्ये पालघर भागामध्ये पिकणारी ही टोमॅटो नेहमीच्या टोमॅटो पेक्षा चवीला थोडी जास्त आंबट असतात... ही टोमॅटो कच्ची असताना खाण्यासाठी जास्त चांगली लागतात... फेब्रुवारी-मार्चमध्ये ही टोमॅटो मुंबईच्या मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes