राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#EB14
#W14

खास गणपती चा वेळेस हे लाडू आवर्जून केले जातात. दत्त जयंतीला कोकणात हे लाडू प्रसादासाठी खास करून केले जातात.
याला राघवदास लाडू म्हणतात कारण यात रवा, ओला नारळ चव, आणि मुख्य म्हणजे एकतारी साखरेच्या पाकात हे लाडू केले जातात. याला नारायणदास लाडू असेही म्हंटले जाते.

राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)

#EB14
#W14

खास गणपती चा वेळेस हे लाडू आवर्जून केले जातात. दत्त जयंतीला कोकणात हे लाडू प्रसादासाठी खास करून केले जातात.
याला राघवदास लाडू म्हणतात कारण यात रवा, ओला नारळ चव, आणि मुख्य म्हणजे एकतारी साखरेच्या पाकात हे लाडू केले जातात. याला नारायणदास लाडू असेही म्हंटले जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
5 व्यक्ती
  1. लाडू साहित्य
  2. 2 कपरवा (बारीक)
  3. 1 कपतूप
  4. 1ओला नारळ
  5. 1/4 कपड्रायफ्रूट पावडर
  6. 1टिस्पून वेलची जायफळ पूड
  7. पाकाचे साहित्य
  8. 3/4 कपपाणी
  9. 1/4 कपदूध
  10. 1 1/2 कपसाखर
  11. सजावट
  12. बेदाणे / किश्मीश
  13. ड्रायफ्रूट काप

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम तयारी करावी. एक जाड बुडाची कढई घ्या. नंतर ती तापवून त्यात तूप घाला, रवा घाला व बदामी रंगावर भाजून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात खावणून घेतलेला ओला नारळ घाला व खमंग वास सुटे पर्यंत भाजून घ्याव. नंतर गॅस बंद करा. त्यात ड्रायफ्रूट पावडर, वेलची जायफळ पूड घालून व्यस्थित एकजीव करा. व झाकून ठेवा.

  3. 3

    पाक करण्यासाठी एका पॅन मधे साखर घाला, त्यात पाणी घाला. साखर विरघळल्यावर त्यात दूध घाला व त्यातली मळी (पाकातली घाण) काढून घ्या म्हणजे पाक स्वच्छ होतो.

  4. 4

    आता पाकाची एक तर होई पर्यंत सतत ढवळत रहा. नंतर 2 ते 3 थेंब पाक एका डिश मधे घ्या व तो दोन बोटावर घेऊन एकतार होत आहे का बघावे. होतं असेल तर पाक तयार आहे.

  5. 5

    आता भाजून घेतलेले रवा नारळ व्यस्थित परत मिक्स करा. नी तयार पाक त्यात घाला व एकजीव करा. साधारण 45 मिनिट ते 1 तास झाकून ठेवा. थोडे सुकले मिश्रण की लाडू वळून घ्या. वरून बेदाणे / किशमिश लावा ड्रायफ्रूट काप लावून घ्या. लाडू तयार.

  6. 6

    नारायणदास दास लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

  7. 7

    तयार लाडू सर्व्ह करा.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Samidha Kulkarni
Samidha Kulkarni @cook_28621071
खूपच छान... लाडू छान दिसतात...
Nice Photography...
👌🏻👌🏻❤️❤️😊

Similar Recipes