बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7 व्यक्तीसाठी
  1. चिकन मॅरिनेट साहित्य
  2. 1 किलोचिकन
  3. 20 grmचिकन 65 मसाला
  4. 2 टीस्पूनहळद पुड
  5. 2 टीस्पूनधणेपुड
  6. 2 टीस्पूनजीरे पूड
  7. 2 टीस्पूनगरम मसाला
  8. 2 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  9. 2 टेबलस्पूनबेसन
  10. दिड टीस्पून काश्मिरी लाल मिरची पुड
  11. 1 कपदही
  12. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  13. 1 टीस्पूनचाट मसाला
  14. 4/5 थेंबलाल कलर
  15. 1/2लिंबू
  16. चवीनुसारमीठ आणि मिरची पुड
  17. 4 टेबलस्पूनतेल
  18. ग्रेव्ही ची तयारी
  19. 4वेलची
  20. 1 इंचदालचिनी
  21. 2जावेत्री
  22. 4लवंग
  23. 4मिरी
  24. 2तमालपत्र
  25. 2हिरवी मिरची
  26. 20 - 25 काजु
  27. 7/8मध्यम आकाराचे कांदे
  28. 4/5मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो
  29. टोमॅटो केचप
  30. 1 टेबलस्पूनआल लसुण पेस्ट
  31. 50 gmबटर
  32. 1/2 कपफुल क्रिम
  33. 1 टीस्पूनहळद पुड
  34. 1 टीस्पूनजीरे पूड
  35. 1 टीस्पूनधणेपुड
  36. 1 टीस्पूनगरम मसाला
  37. चवीनुसारमिरची पुड
  38. मॅगी क्युब
  39. 1/2 कपतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम चिकन मॅरिनेट करून घ्यावे.
    चिकन 2/3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत.

  2. 2

    एक पातेल्यात तेल गरम करून त्यात बेसन हलकाच भाजुन घेणे. यात काश्मिरी लाल मिरची पुड घालुन छान परतून घ्यावे. हे मिश्रण थंड करायला ठेवणे.

  3. 3

    चिकनला हळद पुड, धणेपुड, जिरेपुड, चिकन 65 मसाला, गरम मसाला, आल- लसुण पेस्ट लावा.चवीनुसार मीठ, मिरची पुड घालुन लिंबू पिळावा.

  4. 4

    दही फेटून घ्यावे. भाजलेले बेसन वरील चिकनवर घालावे.कसुरी मेथी, चाट मसाला, लाल कलर घालुन चिकन एकजीव करून घ्यावे.
    हे मॅरिनेट चिकन फ्रिजमधे 4/ 5 तास ठेवणे.

  5. 5

    हे मॅरिनेट चिकन ग्रील करून घ्यावे. ग्रील करायचे आधी हे मॅरिनेट चिकन फ्रिज मधुन दिड तास आधी बाहेर काढून ठेवावे.नंतर चिकन ग्रील करून घ्यावे.

  6. 6

    आता ग्रेव्ही ची तयारी करून घेणे.

  7. 7

    पातेल्यात दोन पळी तेल गरम करून त्यात दिलेला खडा मसाला घालून परतावे. कांदा - टोमॅटो चिरून घालावा. हिरवी मिरची घालावी.किंचित मीठ घालून परतून घ्यावे. कांदा- टोमॅटो पटकन शिजला जातो.हे मिश्रण चांगले भाजुन घ्यावे. थंड झाल्यावर भिजवलेले काजु घालून हे मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटप करावे. आपली ग्रेव्ही चे वाटण तयार.

  8. 8

    पातेल्यात तेल आणि बटर गरम करून त्यातआलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. यात काश्मिरी लाल मिरची पुड, तिखट मिरची पुड, हळद,धणेपुड, जिरेपुड, गरम मसाला, घालून परतून घ्यावे.यातच मॅगी क्युब घालावी.

  9. 9

    यात कांदा टोमॅटो चे वाटण घालुन छान परतून घ्यावे. तेल सुटले की मग चिकन चे फ्राय पीस घालुन 1/2 उकळी द्यावी.यात टोमॅटो केचप, क्रिम, कसुरीमेथी, चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून गॅस बंद करावा.
    कोथिंबीर आवडीप्रमाणे घालावी.

  10. 10

    तिखट मिरची पुड & मीठ घालतेवेळी चव बघून घालावे.
    चिकन मॅरिनेट करताना मीठ - मिरची पुड आणि
    ग्रेव्ही मध्ये मीठ - मिरची पुड यामुळे अंदाज घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes