सुरळीच्या वड्या (Surlichya vadya recipe in marathi)

Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
Mumbai

सुरळीच्या वड्या (Surlichya vadya recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबेसन पीठ
  2. 2 वाट्याताक
  3. कोथिंबीर आवश्यकतेनुसार
  4. 1/2 चमचमोहरी
  5. तेल आवश्यकतेनुसार
  6. मीठ
  7. 1 चमचालाल तिखट

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एक पातेल्यात ताक घेऊन त्यात लाल तिखट व चवीनुसार मीठ घालावे. त्यातच बेसन पीठ घालून ते चांगले फेटून घ्यावे, यावेळी गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी.

  2. 2

    एका भाड्यांत दोन ते तीन छोटे चमचे तेल टाकून ते गरम करा. मग त्यात बेसन आणि ताकाचे केलेले मिश्रण टाका व सतत ढवळत राहा. जोपर्यंत पीठ चमच्याला धरून घट्ट धार लागत नाही, तो पर्यंत ढवळत राहायचे. धारेचे मिश्रण झाल्यावर गॅस बंद.

  3. 3

    मग एका मोठ्या पसरट ताटाला तेल लावून तयार केलेलं पिठाचं मिश्रण हलकेच कागदाच्या पापुद्र्या इतके पसरट पसरवून घ्यावे.

  4. 4

    काही मिनिटांनी हे थंड झाले की त्याच ताटावर त्या पसरवलेल्या पिठावर सरळ रेषेत सुरीने काप द्यावेत आणि त्याच्या सुरळ्या बनवाव्यात.

  5. 5

    मग दोन चमचे तेलात एक चमचा मोहरीची खमंग फोडणी तयार करावी. ही खमंग फोडणी सुरळीच्या वड्यांवर छान पसरावी, म्हणजे आपल्या छान सुरळीच्या नाजुक वड्या खायला तयार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
रोजी
Mumbai
Food Lover| Home Cook| Influencer | Talks about #food|#recipes |#blogging|Journalist| Content Creator |Food Blogger |Mother||In search of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes