हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#UVR
#उपवास_रेसिपी
#हरियाली_साबुदाणा_खिचडी

सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे.
आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 जणांना
  1. 2 कपसाबुदाणा
  2. 2 टीस्पूनसाखर
  3. 1 कपकोथिंबीर
  4. 7-8हिरव्या मिरच्या
  5. 2 इंचआले
  6. 2 टीस्पूनजीरे
  7. 1/4 कपओले खोबरे
  8. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  9. 1/2 कपशेंगदाणा कूट
  10. 1लिंबाचा रस
  11. मीठ चवीनुसार
  12. पाणी आवशयकतेनुसार
  13. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  14. 1उकडलेला बटाटा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात साबुदाणा घेऊन तो स्वच्छ धुवा आणि त्यामध्ये अर्धा इंच पाणी घालून हा साबुदाणा आठ तास भिजत ठेवा.

  2. 2

    सर्व साहित्याची पूर्वतयारी करून घ्या.

  3. 3

    मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या.

  4. 4

    आता भिजवलेला साबुदाणा हाताने एकसारखा करून घ्या आणि त्यामध्ये दाण्याचा कूट मीठ साखर घालून व्यवस्थित एकत्र करा. आता कढईमध्ये तूप घालून शेंगदाणे तळून घ्या. नंतर त्याच तुपामध्ये जीरे घालून खमंग फोडणी तयार करा आणि त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून व्यवस्थित परता.

  5. 5

    आता या फोडणीवर साबुदाण्याचे मिश्रण घालून व्यवस्थित परता. नंतर त्यामध्ये वाटलेली हिरवी चटणी घालून मिश्रण एकजीव करा.

  6. 6

    आता खिचडी वर झाकण ठेवून एक ते दोन वाफा काढा. नंतर लिंबू पिळून पुन्हा खिचडी छान पैकी परतून घ्या.आता यावर तळलेले शेंगदाणे, खोबरं कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करा.
    तयार झाली आपली हरियाली साबुदाणा खिचडी.

  7. 7

    अतिशय चविष्ट आणि आकर्षक अशी हरियाली साबुदाणा खिचडी एका प्लेटमध्ये काढून वरून खोबरं कोथिंबीर शेंगदाणे घालून देवाला नैवेद्य दाखवून गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes