मिक्स पीठाच्या पुऱ्या (Mix Pithachya Purya Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#ASR
आषाढ महिना हा भरपूर पावसाचा,तसंच भरपूर व्रतवैकल्याचाही!इथून पुढचे चार महिने सणावारांची रेलचेल असते.'आषाढस्य प्रथम दिने' म्हणलं की आठवण होते कवी कालिदासाची आणि कालिदास दिनाची.आषाढी एकादशीला चातुर्मासाचीही सुरुवात होते.पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर वारकरी शेतात पेरणी करुन निवांतपणे आषाढी वारीसाठी चालत दर्शनासाठी निघतात🚩.या महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा तथा व्यासपौर्णिमा.गुरुंच्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.🌹
संपूर्ण आषाढ महिन्यात धुव्वाधार पाऊस पडत असतो.🌨️🌧️बाहेर तर पडताही येत नाही.हवेत गारठा निर्माण झालेला असतो.सूर्यदर्शन तर दुर्मिळच... अशावेळी शरीराला पौष्टिकता आणि बल वाढवणारे पदार्थ सेवन करण्याची आपल्या हिंदूधर्मात प्रथा आहे.यासाठी तळणीचे खुसखुशीत असे निरनिराळे पदार्थ करुन एकमेकांकडे पाठवण्याची प्रथा आहे.याला "आषाढ तळणे" असं म्हणतात.
चला...आज या आषाढानिमित्त मिक्स पीठाच्या खुसखुशीत, खमंग पुऱ्यांचा स्वाद घेऊ या!😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5व्यक्ती
  1. 3 कपज्वारीचे पीठ
  2. 2 कपगव्हाचे पीठ
  3. 1 कपडाळीचे पीठ
  4. 7-8हिरव्या मिरच्या
  5. 8-10लसूणपाकळ्या
  6. 3 टेबलस्पूनकडकडीत तेलाचे मोहन
  7. 1 टेबलस्पूनमीठ
  8. 3 टेबलस्पूनपांढरे तीळ
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  14. पीठ भिजवण्यासाठी पाणी आवश्यकतेनुसार
  15. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    परातीत सर्व पीठे व वरीलप्रमाणे सर्व साहित्य घालावे.मिक्सरमधून लसूण मिरचीची पेस्ट करुन पीठामध्ये घालावी.पीठामध्ये मोहन घालावे.

  2. 2

    सर्व मिश्रण हाताने एकसारखे करुन थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे. अर्धातास भिजू द्यावे.पोळपाटावर मोठा गोळा घेऊन पोळीप्रमाणे लाटून घ्यावे.व वाटीच्या सहाय्याने गोल पुऱ्या कराव्यात.किंवा एकेक छोटा गोळा घेऊन एकेक पुरी लाटावी.

  3. 3

    कढईत पुरेसे तेल घेऊन लाटलेल्या पुऱ्या तळाव्यात.छान टम्म फुगतात.लालसर तळाव्यात.मिक्स पीठांच्या पुऱ्या तयार आहेत.गरमागरम सर्व्ह कराव्यात.बरोबर लोणचे,छुंदा द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes