कोलंबीचे कालवण / प्रॉन्स करी (Prawn Curry Recipe In Marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#VNR
विकेंड स्पेशल म्हणून बनवले खास कोलंबीचे कालवण. खूपच चमचमीत आणि टेस्टी असे हे कोलंबीचे कालवण बनते.

कोलंबीचे कालवण / प्रॉन्स करी (Prawn Curry Recipe In Marathi)

#VNR
विकेंड स्पेशल म्हणून बनवले खास कोलंबीचे कालवण. खूपच चमचमीत आणि टेस्टी असे हे कोलंबीचे कालवण बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनटं
2 ते 3 लोक
  1. 250 ग्रॅमधुवून साफ केलेली कोलंबी
  2. 2 चमचेचिंचेची पेस्ट
  3. 1/4 चमचाहळद
  4. 1 चमचालाल तिखट
  5. 1/4 चमचागरम मसाला
  6. 1/4 चमचाकाश्मिरी लाल मिरची पावडर
  7. 3 ते चार टेबलस्पून तेल
  8. 5 ते सहा लसणाच्या पाकळ्या
  9. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  10. 3 ते चार कडीपत्त्याची पाने
  11. 1/2 वाटीखवलेला नारळ
  12. 1टोमॅटो बारीक चिरलेले
  13. 1कांदा बारीक चिरलेला
  14. 2 चमचेभाजलेले धने
  15. चिरलेली कोथिंबीर
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनटं
  1. 1

    सर्वप्रथम कोलंबीला हळद आणि चिंचेची पेस्ट लावून दहा ते पंधरा मिनिटं मिनिटे मॅरीनेट करून घ्यावे.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या, आलं, ओला नारळ, धने, आणि टोमॅटो घेऊन मिक्सरला त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यावी.

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात उरलेला लसूण, कढीपत्त्याची पाने आणि कांदा घालून परतून घ्यावे.

  4. 4

    कांदा परतून झाला की त्यामध्ये तयार वाटण घालावे. नंतर त्यात सर्व मसाले व मीठ घालावे. मसाले व मीठ वाटणामध्ये चांगले परतून घ्यावे.

  5. 5

    वाटण परतून झाले की त्यामध्ये पाणी घालावे. कालवणाला उकळी काढून घ्यावी.

  6. 6

    कालवणाला उकळी आली की त्यामध्ये मॅरीनेट केलेली कोलंबी घालावी. झाकण लावून त्यावर पाणी ठेवावे. आणि मध्यम आचेवर कालवणाला पाच ते सात मिनिटं शिजू द्यावे.

  7. 7

    कोलंबी शिजली की त्यामध्ये वरतून चिरलेली कोथिंबीर घालावी. पुन्हा झाकण काढून कालवणाला तीन ते चार मिनिटं शिजवून घ्यावे. गरमागरम कोलंबीचे कालवण भात, भाकरी,किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Similar Recipes