शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#ZCR
मटार गाजर सिमला मिरची कांदा सगळं घालून केलेला हा फ्राईड राईस छान होतो

शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)

#ZCR
मटार गाजर सिमला मिरची कांदा सगळं घालून केलेला हा फ्राईड राईस छान होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 मोठे वाटी सेला बासमती राईस
  2. 1 वाटीसिमला मिरचीचे तुकडे, एक वाटी गाजर चे तुकडे,एक वाटी मटार, एक वाटी कांदा बारीक चिरलेला व दीड वाटी कांद्याची पात
  3. 1 चमचामिरपूड, एक चमचा काश्मिरी चिली पेस्ट,पाव चमचा चिली फ्लेक्स
  4. दीड चमचा मोठा ऑलिव्ह ऑइल
  5. 2 चमचेटोमॅटो सॉस, एक चमचा चिली सॉस, एक मोठा चमचा शेजवान सॉस,अर्धा चमचा सोया सॉस
  6. चवीनुसारमीठ
  7. भात शिजताना घालण्यासाठी एक चमचा तेल

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ धुऊन ते पंधरा मिनिटे भिजत ठेवावे एका साईडला गॅसवर पाणी उकळत ठेवून त्यामध्ये मीठ व तेल घालावे पाणी छान उकळलं की हे भिजलेले तांदूळ त्यात घालून ते मिडीयम गॅसवर शिजू द्यावे भात शिजत आला की तो एक दाणा काढून तो दाबून बघावा तो व्यवस्थित दाबला गेला म्हणजे आपला भात शिजला त्याला जास्त शिजवू नये व कमी पण शिजवू नये मग तो चाळणीमध्ये निथळत ठेवावा पाणी काढून टाकावे व परातीमध्ये पसरवून थंड करावा

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा मिरची व गाजर मटर व अर्धी पात घालून मोठ्या गॅसवर दोन मिनिटे परतावे त्यामध्ये मिरी पावडर, चिली फ्लेक्स काश्मिरी मिरचीची पेस्ट सोया सॉस,चिली सॉस, टोमॅटो सॉस,शेजवान सॉस मीठ घालून सगळं एकजीव करावे

  3. 3

    त्यामध्ये शिजलेला भात घालून तोही छान परतून घ्यावा व एकजीव करावा दोन मिनिटांनी गॅस बंद करून उरलेली पात घालावी व गरम गरम शेजवान राईस खायला द्यावा अतिशय टेस्टी व सुंदर असा शेजवान राईस तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes