खव्याच्या पोळ्या (Khavyachya polya Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम खवा कुस्करून घ्यावा. आता गॅस वर कढई ठेवून,खवा घालून चांगला परतून घ्यावा लाल होईपर्यंत.
- 2
त्यानंतर खवा एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवावा. एका बाजूला गव्हाचे पीठ मळून घ्यावे. पिठामध्ये तेल आणि थोडे चिमूटभर मीठ घालून गोळा मळून घ्यावा. आता खव्यामध्ये पिठी साखर घालून चांगले मिक्स करून घ्यावे. पिठीसाखर कमी जास्त आपल्या आवडीनुसार घ्यावी. आता त्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालावी आणि चांगले मिक्स करावे.
- 3
त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून घ्यावे. एक गोळा घेऊन वाटीच्या आकार देऊन त्यामध्ये खवा घालावा, साधारण 3 टेबलस्पून मावेल इतका. आता हळूहळू बंद करावा आणि त्याची गोल पोळी लाटावी. बारीक गॅस करून तवा गरम करून घ्यावा आणि झालेली पोळी तव्यावर टाकावी.
- 4
एका बाजूला भाजल्यानंतर पलटून घ्यावे आणि भाजलेल्या पोळी वर सर्व बाजूंनी तूप घालावे. दुसऱ्या बाजूलाही तसेच करावे. खव्याची पोळी तयार झाली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
आता बाजारात सगळ्याच गोष्टी उपलब्ध असतात.पण तरी घरी केलेल्या पदार्थाची चव आणि कौतुक वेगळंच असतं. घरी श्रीखंड करणं एकदम सोप्प असतं ,पण वेळेअभावी बरेचदा विकत आणलं जातं.ही सोपी रेसिपी मी केली आहे. Preeti V. Salvi -
-
सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi)
#PRRपितृपक्षात पूर्वजांसाठी पूर्वापार चालत आलेल्या पदार्थात नैवैद्यासाठी आपण सांजाच्या पोळ्या करतो. घरी सर्वांना साजाच्या पोळ्या आवडतात देखील. चला तर बघूया.. सांजाच्या पोळ्यांची रेसीपी..🌝 Priya Lekurwale -
खव्याची खुसखुशीत पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्य||गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः , गुरुर साक्षात परम ब्रह्म , तस्मै श्री गुरुवे नमः ||||ध्यान मूलं गुरुर मूर्ति , पूजा मूलं गुरु पदम् मंत्र मूलं गुरुर वाक्यं , मोक्ष मूलं गुरुर कृपा||आईवडील माझे पहिले गुरु त्यांच्यापासुनच माझे अस्तित्व सुरु.खास गुरूपोर्णिमे साठी सोपी खव्याची खुसखुशीत पोळी. Suvarna Potdar -
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
आज चतुर्थी असल्याने, तसेच खवा ही घरात होता म्हणून खवा पोळी केली.झटपट होणारी रेसिपी आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #बेसनलाडू #दिवाळी_फराळदिवाळी..सणांची महाराणी..ती येतेच मुळी थाटात..तिचे आगमन मनामनाला आनंदोत्सव साजरा करायला लावणारं..मनामनातील अंधःकार दूर करुन स्नेहाची प्रेमाची पणती लावून प्रकाशाची ,तेजाची आरती करत नात्यांचा उत्सव साजरा करायला ती येते..मनामनातील आपुलकीची मिणमिणती ज्योत का असेना ती सदैव तेवत ठेवण्यासाठी येते.आणि पुनश्च चैतन्य प्रदान करुन नात्यांचे सप्तसूर इंद्रधनु रंगांत रंगून जातात.म्हणून तर या सर्वगुणसंपन्न महाराणीचे स्वागत मोठ्या अदबीने धूमधडाक्यात केलं जातं..याची सुरुवातच मुळी बेसनाच्या लाडूचा घाणा भाजण्यापासून केली जाते..चहुकडे बेसनाचा खमंग दरवळच हिच्या आगमनाची तुतारी फुंकतो..आणि सुरु होतात तिच्या प्रतिक्षेतील आनंदक्षण.. ***शकुनाची करंजी,शकुनाचा लाडू आहे प्रत्येक घराचा गोड वारसा.. त्यांना साथ देती खुसखुशीत शंकरपाळी आणि अनारसा.. कुरकुरीत चिवड्या सोबत खमंग चकली शेवेची जाळी सांगे सुखाची दिवाळी आली... दिवाळी म्हणजे यशाचा कंदिल,मांगल्याचा दिवा.. सुगंधित तेल उटण्याच्या साथीला पहाटेचा गारवा... दिवाळी म्हणजे इंद्रधनु रांगोळीला पणत्यांची आरासमग गप्पांचा फड रंगे सोबत अन्नपूर्णेचा फराळ खास*** चला तर मग दिवाळी महाराणींसाठी तुतारी फुंकून तिच्या आगमनाची वर्दी देऊ या..आणि ऐक्याचा, एकमेकांना बांधून ठेवणारा,पृथ्वीतत्त्वाचा बेसन लाडू बांधू या.. Bhagyashree Lele -
खवाबेस पोळी (khawabase poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी खव्याच्या पोळ्या मी पोळीचे नवीनच नामकरण केलेले आहे पहिल्यांदा. तसे तर मी खव्याच्या पोळ्या बनवते पण आता तुम्हाला सांगायचा आहे ना सगळी रेसिपी आणि मी त्यामध्ये बेसन पण ऍड केला आहे त्यामुळे मी त्याचं नवीन नामकरण खवाबेस केले. खव्याच्या पोळ्या सगळेच करतात पण त्या जास्तच गोड होते म्हणून मी त्यामध्ये बेसन ऍड केले तुम्ही पण बनवून पहा खूप छान लागतात. काहीतरी नवीन टेस्ट माझ्या घरी नागपंचमीचे करंज्या बनवायला खवा आणलेला होता त्यामधून वाचलेल्या खव्याच्या पोळ्या करण्याचा बेत होता माझा आणि आपल्याला सात्विक रेसिपी नवीन चॅलेंज पण आले होते तर म्हटलं चला नवीन काहीतरी करावे आणि ते पण एक नंबर झाली मला करून खूप आनंद झाला मैत्रिणींनो चला तर बनवूया खव्याच्या पोळ्या नाही नाही खवा बेस पोळी.... Jaishri hate -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbrआज मी नारळी पौर्णिमा करता एक रेसिपी सादर करत आहे. सगळे नारळी भात व नारळाच्या वड्या करतात पण मी आज तुमच्या समोर सादर करत आहे नारळाची खीर. ही माझ्या भावाला खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आज ही खीर बनवत आहे. Sarita Nikam -
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
हार्टशेप गाजर हलवा (herat shape gajar halwa recipe in marathi)
#Heartव्हॅलेन्टाइन डे स्पेशल हार्टशेप रेसिपी दुसरी. गाजराचा मुळातच लाल रंग. त्यामुळे गाजराचा हलवा बनवला. Sujata Gengaje -
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2विक 2#रेसिपीमॅगझीनWeek 2 recipemagzine Suvarna Potdar -
अफलातून बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीमुंबईत सुलेमान मिठाईवाल्याकडे रमझान मध्ये खाल्ली जाते अशी प्रसिद्ध अफलातून बर्फी मिळते तीच मी बनविण्याचे ठरविले. तसं ही मिठाई मी कधी खाल्ली नाही त्यामुळे तीच चव आली आहे की नाही ते मी नाही सांगू शकत पण जवळजवळ बेळगावचा कुंदा लागतो तशी चव आली आहे या मिठाईला. आणि खरंच नावाप्रमाणेच अफलातून बनली आहे. Deepa Gad -
सातारा कंदीपेढा (satara kandi peda recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 3 प्रत्येक जिल्हयाचे काहीतरी वैशिष्ट्य असते.साताराचे कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत.दुध घट्ट होईपर्यंत आटवले जाते. खवा जास्त भाजल्यामुळे त्याला एक पिवळसर,लालसर असा रंग येतो आणि हे पेढे जास्त दिवस टिकतात. Sujata Gengaje -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळीहोळी स्पेशल रेसिपी चॅलेंज त्यासाठी तयार केलेली पुरणपोळी होळी म्हटली की पुरणपोळी ही सर्वांच्या घरांमध्ये केली जाते गरम गरम पोळी आणि साजूक तूप अप्रतिम लागते Sushma pedgaonkar -
साधी घडीची पोळी/चपाती (रोटी) (chapati recipe in marathi)
#GA4 #Week25 #Rotiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी Pranjal Kotkar -
-
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर मकर संक्रांती हा हिंदू दिनदर्शिकेतील एक उत्सव दिवस असून तो सूर्य देवताला समर्पित आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीवर येतो तेव्हाच हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील पारंपरिक 'गुल पोली', तिळगुळ वडी किंवा तिळगुळ लाडू तयार करतात. मूळ घटक गुळ व तीळ शरीराला उबदार ठेवतात आणि थंडीच्या काळात आवश्यक प्रमाणात पोषण देतात. Pranjal Kotkar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#AAआज शेवटचा श्रावणी शुक्रवार,आज मी केल्यात पुरणपोळ्या, Pallavi Musale -
अळीवाचे लाडू (aliwache ladoo recipe in marathi)
मूळ महाराष्ट्रातील पदार्थ असून पारंपरिक पदार्थ आहे#AA Pallavi Musale -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRभारतात प्रत्येक सण अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी हा असा हिंदू सण आहे ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते. होलिकादहन, रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो. या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण साजरा करण्यासाठी काही खास खाद्यपदार्थही केले जातात.होळी पौर्णिमा या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे पुरण पोळी करतात चला तर बघुया पुरण पोळी रेसिपी Sapna Sawaji -
-
पुरणपोळी साखर गुळाची (sakharechi puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत. याशिवाय नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. Vandana Shelar -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR तीळगुळ वडी मउसुत व खमंग अशी तीळगुळ वडी Shobha Deshmukh -
-
-
-
गूळ पोळी(मकर संक्रांत रेसिपी) (Gul Poli Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांतीच्या सणासाठी गुळपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. ही पोळी चवदार पौष्टिक आणि तिळाची पोळी असल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणारी आहे. आशा मानोजी
More Recipes
टिप्पण्या (2)