सुरती उंधीयु पुरी (Surti Undhiyu Puri Recipe In Marathi)

#BWR
#बाय_बाय_विंटर_रेसिपीस
यावर्षीच्या थंडीला बाय बाय करताना मस्त असा "सुरती उंधीयु पुरी" चा बेत केला होता. गुजरात राजस्थान मधे फेमस असलेली ही उंधीयु भाजी थोड्या फार वेगळ्या प्रकारे केली जाते. आमच्या कडे सगळ्यांना ही सुरती उंधीयु भाजी बरोबर पुरी खायला खूप आवडते. या भाजीमधे जरा तेल जास्त लागतं. तसंच उंधीयु मधल्या मुठिया तळण्यासाठी पण तेल लागतं. थंडी मधे जरा तेल तुपाचे पदार्थ खायला चांगले पण एकदा उन्हाळा सुरू झाला की तेलकट पदार्थ तब्येतीला पण चांगले नाहीत. म्हणूनच सरत्या थंडीला बाय बाय करताना मस्त अशी उंधीयु पुरी बनवली. ह्या मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात. त्यामुळे सगळ्या भाज्या पोटात जातात. ही आवडते ती नको असे करु शकत नाही. म्हणून मला अशी मिक्स भाजी करायला आणि खायला पण खूप आवडते. उंधीयु मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात, त्यामुळे त्या भाज्या निवडायला आणि बनवायला पण जरा वेळ लागतो. पण एकदा का उंधीयु भाजी तयार झाली की त्याचा सुगंध घरभर दरवळत असतो. खायला एकदम मस्तच लागते. या उंधीयु भाजीची रेसिपी पुढे देत आहे.
सुरती उंधीयु पुरी (Surti Undhiyu Puri Recipe In Marathi)
#BWR
#बाय_बाय_विंटर_रेसिपीस
यावर्षीच्या थंडीला बाय बाय करताना मस्त असा "सुरती उंधीयु पुरी" चा बेत केला होता. गुजरात राजस्थान मधे फेमस असलेली ही उंधीयु भाजी थोड्या फार वेगळ्या प्रकारे केली जाते. आमच्या कडे सगळ्यांना ही सुरती उंधीयु भाजी बरोबर पुरी खायला खूप आवडते. या भाजीमधे जरा तेल जास्त लागतं. तसंच उंधीयु मधल्या मुठिया तळण्यासाठी पण तेल लागतं. थंडी मधे जरा तेल तुपाचे पदार्थ खायला चांगले पण एकदा उन्हाळा सुरू झाला की तेलकट पदार्थ तब्येतीला पण चांगले नाहीत. म्हणूनच सरत्या थंडीला बाय बाय करताना मस्त अशी उंधीयु पुरी बनवली. ह्या मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात. त्यामुळे सगळ्या भाज्या पोटात जातात. ही आवडते ती नको असे करु शकत नाही. म्हणून मला अशी मिक्स भाजी करायला आणि खायला पण खूप आवडते. उंधीयु मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात, त्यामुळे त्या भाज्या निवडायला आणि बनवायला पण जरा वेळ लागतो. पण एकदा का उंधीयु भाजी तयार झाली की त्याचा सुगंध घरभर दरवळत असतो. खायला एकदम मस्तच लागते. या उंधीयु भाजीची रेसिपी पुढे देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
कंद आणि इतर भाज्या साफ करून त्याचे तूकडे करुन आणि लहान वांगी मधे दोन चिरा पाडून पाण्यात घालून ठेवावी. सुरती पापडी आणि वाल पापडी साफ करून त्याचे तूकडे करुन घ्यावे.
- 2
मेथी मुठीया बनवण्यासाठी मेथीची पाने स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली. त्यात बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, तिखट पूड हळद धणे जीरे पावडर आणि गरम मसाला घालून १ टीस्पून तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला.
- 3
मिक्सर मधून आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण पात घालून पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट मेथीच्या मिश्रणात घातली.
- 4
मेथीच्या मिश्रणात जरासं पाणी घालून मिक्स केले, मग हाताला तेल लावून मेथीच्या मुठीया (लहान गोळे) करून घेतल्या मग तेलात डिप फ्राय केले.
- 5
उंधीयुचा मसाला बनवण्यासाठी लसूण पात, कांदा पात आणि कोथिंबीर मिक्सर मधून जाडसर वाटून घेतली, ओलं खोबरं घेतलं.
- 6
ओल्या खोबऱ्यामधे, कांदा पात, लसूण पात आणि कोथिंबीरीचं मिश्रण घालून त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, भाजलेल्या तिळाचे कुट, हळद, मीठ, साखर, धणे जीरे पावडर आणि लिंबाचा रस घालून मिक्स केले.
- 7
ओल्या खोबऱ्याचे मिश्रण लहान वांग्यामधे भरले, त्यात इतर भाज्या पण घालून मिक्स केल्या. आणि उरलेला खोबर्राचे मिश्रण सगळ्या भाजीमधे घातले. भाजी मधे थोडं तिखट पूड किंवा २ मिरच्या घालाव्यात, भाजी छान चविष्ट लागते.
- 8
सगळ्या भाज्यांच्या वरती तळलेले मेथीचे मुठीये ठेवले आणि जरासं पाणी घालून १० मिनिटे उंधीयु भाजी शिजवून घेतली.
- 9
चपातीच्या पीठाच्या गोळ्या करून त्याच्या पुर्या लाटून गरमागरम पुर्या तळून घेतल्या.
- 10
गरमागरम उंधीयु भाजी बरोबर गरमागरम पुर्या आणि जिलेबी वाढली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उंधियु (Undhiyu Recipe In Marathi)
#BWR1थंडी म्हटलं की फक्त उंधीयो ही सर्व भाज्यांचा समावेश असलेली रेसिपी डोळ्यासमोर येते. एका थंडीच्या सिझनमध्ये सुगरण गृहिणी किमान चार वेळा तरी उंधीयो करतच असेल, इतकी ती चविष्ट आणि घरातील सर्व मेंबरना आवडणारी अशी रेसिपी आहे. हा एक गोष्ट खरी, उंधियो बनवताना खूप कष्ट आहे, वेळ लागतो, पण म्हणतात ना सबुरी असेल तर त्याचा फळ नक्कीच गोड असतं. त्याप्रमाणेच उंधियो ही भाजी अतिशय चविष्ट लागते. त्यामुळे या थंडीला बाय-बाय करताना उंधियो ही रेसिपी मी केली. Anushri Pai -
भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेसल_रेसिपीसमकरसंक्रांतीच्या आसपास शेतामधे अगदी लहान लहान कोवळ्या भाज्या यायला लागतात. लहान लेकरांसारख्या दिसणार्या कोवळ्या भाज्या खूप छान दिसतात. म्हणून या भाजीला लेकुरवाळी भाजी असं पण म्हणतात. लहान लहान वांगी, बटाटे, ओला वाटाणा, ओला हरभरा, पावटा, गुलाबी रंगाची गाजरं अशा अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या एकत्र शिजवून त्यात जरासे मीठ मसाले घालून केलेल्या भाजीची चव अगदी अफलातून लागते. आपल्या कडे उपलब्ध असलेल्या भाज्या घालून भोगीची भाजी करावी. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. भाजी बनवायला पण जास्त वेळ लागत नाही, शिवाय कोवळ्या भाज्या असल्यामुळे पटकन शिजते. या भाजीची सविस्तर रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप देत आहे. Ujwala Rangnekar -
उंधियो (Undhiyu Recipe In Marathi)
थंडीमध्ये बाजारात मिळणाऱ्या सर्व भाज्या उंधियो या रेसिपी मध्ये अतिशय स्वादिष्ट स्वरूपात समोर येतात. उंधियो ही रेसिपी थंडीच्या दिवसातच छान बनवता येते कारण काही भाज्या फक्त थंडीतच मिळतात.उदाहरणार्थ सुरती पापडी ,लसणीची पात.चला तर आज पारंपारिक पद्धतीने उंधियो कसा करतात हे बघूया! Anushri Pai -
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
#EB9#week9#खर तर ही गुजराथी फेमस रेसिपी पण एकदा म्हणजे यु.ट्युब नव्हते तेव्हा अशीच डोक लढवून केला उंधियो नि घरातले नि बाहेरची ही मंडळी (ऑफिस मधील नि मैत्रीणी )एकदम माझ्या उंधियो च्या प्रेमातच पडली.मग काय दरवर्षी दोनदा तिनदा तरी करतेच .मी मोठ्या प्रमाणात करते पण तुम्हाला त्यातल्या त्यात लहान प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला आहे गोड मानून घ्या.खुपच छान होतो . Hema Wane -
सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9उंधियो आणि थंडी यांचही अतूट नातं आहे बरं का!उंधियु ही गुजरातची खास भाजी.गुजराती शब्द उंधु म्हणजे वरची बाजू खाली....कारण पारंपारिक गुजराती उंधियु हा जमिनिखाली खड्डा करुन मातीच्या मडक्यात (माटलु-गुजराती शब्द)वरची बाजू खाली करुन वरुन खालून धग लावून खूप वेळ शिजवून केलेला असतो.आपण करताना मोठी कढई किंवा प्रेशरकुकरही वापरु शकतो.आपल्याकडे संक्रांतीच्या भोगीला लेकुरवाळी भाजी करतो तशीच ही सुद्धा एक मिक्स व्हेजच म्हणा ना!खरंतर सगळ्यांचाच हा खूप आवडता पदार्थ.गेली अनेक वर्ष आमच्याकडे थंडीत उंधियो ठरलेलाच आहे.आणि करतेही खूप प्रमाणात.मी करायला तयार आणि खवैय्ये खायला तयार😋😋अथक तयारी करुन सगळ्या रंगीबेरंगी भाज्या ओट्यावर जमवल्या की एक फेज पार पडले...☘️🌱🍆🥔🥥 अप्रतिम काॅंबिनेशन पाहून नेत्रसुखद आनंद मिळतो तो कॅमेरा बंद करायलाच हवा😃बाकी पुढेही क्लिष्ट काम म्हणजे भाज्या तळणे,मसाले करणे,भरणे,मुठीया करणे म्हणजे खमंग वासांनीच रसना तृप्ती!😃जेव्हा पातेल्यात/कुकरमधे शेवटी या भाज्यांचे थर उतरतात तेव्हा कार्यसमाप्तीची जाणिव होऊ लागते आणि भरपूर ओवा आणि मसाल्यांचा दरवळ सुटू लागला की हुश्श करत जरा डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर टेकायचे!!🤣 आपल्या भोगीच्या भाजीचे जसे संक्रांतीला महत्त्व तसे गुजरातेत उंधियुचे!आणि चव वर्षभर जीभेवर रेंगाळणारी....करायला खूपच किचकट आणि वेळखाऊ,चिराचिरी,सोलणे,निवडणे,धुणे यासाठी १-२दिवस पूर्वतयारी आवश्यक!....इतका त्रास असतानाही तो करण्याची मजा औरच....माझा सर्वात आवडता पदार्थ!!पण एकदा केला की २-३दिवस सहज खाता येतो...अर्थात फ्रीजमधे ठेवून..लागेल तसा गरम करुनच...थंडीत तर गरमागरम उंधियोचा स्वाद तर घ्यायलाच हवा! Sushama Y. Kulkarni -
कंदमुळ म्हणजेच ऋषीची भाजी (rushichi bhaji recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_रेसिपी#कंदमुळ_म्हणजेच_ऋषीची_भाजीगणपती उत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी आमच्याकडे प्रामुख्याने कंदमुळं म्हणजेच ऋषीची भाजी नैवेद्यासाठी बनवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र उकडून मिक्स करतात. तसेच या भाजीला तेल, हिंग मोहरीची फोडणी देत नाही. आणि यात फक्त मोजकेच मीठ, मसाले घालून खूप अप्रतिम चवीची कंदमुळं म्हणजेच ऋषीची भाजी तयार होते. ही भाजी नंतर खूप घरी वाटली जाते. आमच्या इकडे लहान मोठे सगळे जण आनंदाने आणि आवडीने कंदमुळ म्हणजेच ऋषीची भाजी खातात. दोन तीन दिवसांनंतर पण ही भाजी मुरल्यामुळे खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar -
ऊंधीयो (Undhiyu Recipe In Marathi)
#EB9#W9थंङीची चाहुल लागते आणी मन प्रसन्न होतं.शरीर ताजतवानं होतं.बाजारातही छान वेगवेगळ्या भाज्या व कंद दीसु लागतात आणी मग सहाजीकच ऊंधीयो लरोघरी केला जातो.पद्धत वेगळी असू शकते पण चव अप्रतिम. शिवाय सर्वांना आवङणारा. थोङा प्रपंच जास्त असतो पण जीभेवर आला की सर्व कष्ट विसरून जातो. Anushri Pai -
सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#उंधियो Bhagyashree Lele -
-
भोगी ची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकरमकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात.या दिवशी सकाळी विशेष बेत असतो.बाजरीची भाकरी,मिश्र भाजी म्हणजे भोगी ची भाजी.सर्व प्रकारच्या शेंगा, वांगी तुरीचे दाणे , पोपटी चे दाणे,तिळ,हिरवा लसूण हे सगळे मिळून ही भाजी बनवल्या जाते. Deepali dake Kulkarni -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
भोगिची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#letpost#bhogibhajiभोगिची भाजी वेगवेगळ्या प्रांतात तेथील हिवाळ्यात मिळणाय्रा भाज्या घालून बनवली जाते. पारंपारिक भाजीत 13 किंवा त्यापेक्षा जास्त भाज्या घातल्या जातात.तसेच काही ठिकाणी कांदा लसूण घालतात पण नैवद्याला कांदा लसूण काही ठीकाणी चालत नाही.मसालेही उपलथ्दते नूसार वापरून ही रेसेपि बनवली जाते. Jyoti Chandratre -
उंधियो (undhiyu recipe in marathi)
#EB9 #W9गुजरात मधील पारंपरिक असा हा पदार्थ.यात अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र घालून ही भाजी तयार होते.:-) Anjita Mahajan -
वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi)
#KGR#वेज_कोल्हापूरीरेस्टॉरंट मधे गेल्यावर सगळ्यात जास्त मागवली जाणारी एक भाजी म्हणजे वेज कोल्हापूरी. मस्त चमचमीत भाजी जी रोटी, नान किंवा राइस बरोबर खायला खूप छान लागते. आपल्या आवडत्या आणि आपल्या कडे उपलब्ध असतील त्या भाज्या घालून ही भाजी बनवू शकतो. लहान मोठे सगळ्यांचीच आवडती अशी ही भाजी आहे. याच वेज कोल्हापूरीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
सुरती उंधियो (surti undhiyo recipe in marathi)
#मकरमेहनतीचं पण रुचकर अशी ही मिक्स भाजी गुजराती पद्धतीने केलेली सर्व भाज्यानी परिपूर्ण अशी ही भाजी एकदम टेस्टी व पौष्टीक असते सर्व रुचिनी भरपूर अशी हे सुरती उंधियो तुम्हाला आवडेल ,तुम्हीही नक्कीच try करा Charusheela Prabhu -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
मेथी बाजरी पुरी / Millet (methi najari puri recipe in marathi)
#Milletबाजरी हिवाळ्यात खायला खूप पौष्टिक असते.तसेच हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर पालेभाज्या मिळतात त्यातील मेथी घेऊन मेथी बाजरी पुरी बनवली आहे त्यामुळे ती अजूनच पौष्टिक आणि चविष्ट तयार होते. Vandana Shelar -
सुरती उंधियु
#myfirstrecipeनमस्कार सखींनो 🙏Cookpad community वरील ही माझी पहिली वहिली पोस्ट.मग काही हटके, जोरदार नको व्हायला.मस्तच थंडी पडली आहे, गुलाबी मौसम है...तो चलो कुछ तुफानी करते है..😜मैत्रिणींनो माझी आजची रेसिपी आहे ...मस्त चमचमीत, चविष्ट आणि पारंपरिक," सुरती उंधियु " Anuja Pandit Jaybhaye -
उंधियो (Undhiyo/ Undhiyu recipe in marathi)
#EB9#w9#उंधियोउंधियो ही रेसिपी हिवाळ्यात तयार केली जातेगुजरात आणि मुंबईत भरपूर प्रमाणात ही रेसिपी तयार केली जाते गुजराती लोकांची ही रेसिपी आहे.गुजरातचा मुख्य सण उत्तरायण ला उंदियो तयार केला जातो. लहानपणापासून माझी मम्मी ही रेसिपी तयार कराईची मला ती खुप आवडायची भरपूर भाज्या असल्यामुळे रेसिपी खायला खूप आवडते माझे पप्पा नेहमी सुरत ला जायचे सुरत वरून आमच्या साठी उंदीयो नेहमी आणायचे आई ला नेहमी सांगायचे असाच बनव आई तसाच बनवून खाऊ घालायची पण आता मुंबईला आल्या पासून गुजराती फ्रेंड असल्यामुळे त्यांच्या पद्धतीचाही उंदीयो शिकली आहे त्यात अजून बऱ्याच भाज्या टाकल्या जातात आमच्या गावाकडे मिळायच्या नाही पण मुंबईला बाजारात तयार करण्यासाठी हिवाळ्यातील खास उंधियो च्या भाज्या अवेलेबल असतात .आपल्या आवडी नुसार भाज्या टाकू शकतो कमी जास्त प्रमान करू शकतोचला तर जाणून घेऊया पाककृती Chetana Bhojak -
राजगिरा वरई पुरी भाजी (rajgira varai puri bhaji recipe in marathi)
#fr पुरी भाजी हे combination उपवासाचे असो किंवा बिना उपवासाचे असो..सर्व भारतीयांचे diehard favourite combination..अगदी Breakfast to dinner..24×7चालणारं,धावणारं...😀 पुरी....(बालकविता)एकदा एक पुरीटम्म फुगलीउकळत्या तेलातडुंबत बसलीतिकडून आली आईम्हणते बाई बाईअसं का कुणी वागतंउकळत्या तेलात डुंबतंझालं...पुरी बाईंचाचढला की हो पारारागानेही वाढलासंताप आणि तोरारागाने पुरीचारंग अजून खुललाआईने भरभरहात चालवला पुरी मग टुण्णदिशी पानात पडली बटाटा भाजीला पाहून गोडच हसलीश्रीखंडाची वाटीबसली शेजारी लाजेने पुरी झाली आणखीन सोनेरीदूरवरुन हलत डुलतठकुताई आल्यापुरी भाजी श्रीखंडपाहून जीभल्या चाटल्यावदनि कवळ घेता म्हणत पानावर बसल्यापुरी भाजी श्रीखंडालामग उकळ्या फुटल्या..©®भाग्यश्री लेले १८ मार्च,२०२१ Bhagyashree Lele -
मेथी मुठिया घालून बनवलेले उंधियु (Undhiyu recipe in marathi)
#GA4#week19'METHI' की वर्ड घेऊन मी मेथी मुठीया बनवली आहेत चहा सोबत अप्रतिम लागते आणि' उंधियु ' ही गुजरात मधील अगदी लोकप्रिय भाजी आहे..मकर सक्रांतीच्या दिवशी म्हणजे उत्तरायण ला खास बनवली जाते...त्या मध्ये ही मेथी मुठीया हमखास पाहायला मिळते. Shilpa Gamre Joshi -
मसाला पुरी / तिखट मिठाची पुरी (masala puri recipe in marathi)
#पुरीही पुरी कोणाला आवडते ??आवडत नाही असे होतच नाही... बरोबर न ?त्यात ती टम्म फुगलेली पुरी जणू सगळ्या लहान मुलांचे आकर्षण म्हणायचे...कोणी म्हणते पुरी रागावली म्हणून तिचे गाल लाल हुन, टम्म फुगले... या वरून पुरीचे बडबडगीत आठवले - "चुली वरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल"...प्रवासात, सहल, एरवी चहा बरोबर किंवा नुसती पण खायला छानच लागते...गार असो की गरम कशीही छानच लागते...आणि मुख्य म्हणजे ती खराब होतं नाही शिळी झाली तरी...हे मात्र मुख्य वैशिष्ट्य आहे... Sampada Shrungarpure -
उंधियो (unhdiyo Recipe in Marathi)
खर तर ही गुजराथी फेमस रेसिपी पण एकदा म्हणजे यु.ट्युब नव्हते तेव्हा अशीच डोक लढवून केला उंधियो नि घरातले नि बाहेरची ही मंडळी(ऑफिस मधील नि मैत्रीणी )एकदम माझ्या उंधियो च्या प्रेमातच पडली.मग काय दरवर्षी दोनदा तिनदा तरी करतेच .मी मोठ्या प्रमाणात करते पण तुम्हाला त्यातल्या त्यात लहान प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला आहे गोड मानून घ्या.खुपच छान होतो . Hema Wane -
#संक्रांती# भोगीची भाजी
भोगीची भाजी ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी आहे जी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनविली जाते . Vrushali Patil Gawand -
उंधियु (undhiyu recipe in marathi)
#EB9 #W9हिवाळ्याला सुरुवात झाली की प्रसिद्ध गुजराती उंधियु च्या भाज्या मार्केटमध्ये दिसायला लागतात. दरवर्षी या सीझनमध्ये किमान दोन वेळा तरी उंधियु केला जातो. उंधियो करण्याच्या अनेक पद्धती आहेत मी झटपट होणारी कुकर मधली उंधियोची रेसिपी आज दाखवणार आहे. या रेसिपीला वेळही कमी लागतो आणि तेलाचे प्रमाणही यांमध्ये कमी असते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी ही रेसिपी खूपच सोपी पडेल असे मला वाटते.Pradnya Purandare
-
रताळ्याची पुरी (Ratalyachi puri recipe in marathi)
#EB15 #Week 15#विंटर स्पेशल ई-बुक चॅलेंजमहाशिवरात्री च्या काळात भरपूर प्रमाणात रताळी उपलब्द असतात त्यामुळे मी आज रताळी पुरी करण्याचा बेत केला😋😋#रताळाची पुरी Madhuri Watekar -
कुर्मा पुरी (kurma puri recipe in marathi)
#KS8आजची रेसिपी आहे कुर्मा पुरी. यासाठी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. Kamat Gokhale Foodz -
ग्रीन उंधियू (Green Undhiyu Recipe In Marathi)
#NVRहिरवी लसणाची पात, कोथिंबीर व भाज्या वापरून केलेला हा उंधियू टेस्टी होतो Charusheela Prabhu -
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9मोस्ट fav आहे,संक्रांतीचा वाट बघून भाज्या मिळाल्या की 4ते 5वेळा होताच,माझ्या मुलाला खूप आवडते Charusheela Prabhu -
तोंडली सुरण भाजी (Tondli Suran Bhaji Recipe In Marathi)
#DR2असलेल्या साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करणे हे फक्त गृहिणीलाच ठाऊक. रोज जेवणात चवीला वेगळं काहीतरी आणि सर्वांना आवडेल असं असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. तोच तिचा प्रयत्न वेगवेगळ्या रेसिपी तयार होण्याच्या मागे फलप्रद होतो. अशीच ही एक नवीन रेसिपी Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या