कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्यांचे उभे अगदी लांबट पातळ काप करून घेतले. तसेच कोथिंबीर व हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. सर्व एका बाऊलमध्ये मिक्स करून त्यात मीठ, लिंबाचा रस, थोडी पिठीसाखर घालून मिक्स केले.
- 2
सॅलड मिश्रण बनवण्यापूर्वी आपण सर्वात प्रथम पोळीसाठी डो तयार करून घेतला. त्यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात कणिक व मैदा घेऊन त्यात पिठीसाखर, मीठ व तुपाचे मोहन घालून चांगलं मिक्स करून घेतलं त्या मिश्रणाची मूठ वळली पाहिजे इतपत तूप घातले. नंतर थोडे पाणी घालून मिडीयम सॉफ्ट तयार केला व पंधरा मिनिट झाकून ठेवला.
- 3
आता टोमॅटोचे मिश्रण बनवून घेतले. त्यासाठी एका बाऊलमध्ये टोमॅटो सॉस, मिरपूड, तिखट, जिरेपूड, मीठ पिठीसाखर चाट मसाला सर्व मिक्स करून आपले मिश्रण तयार केले.
- 4
नंतर तीन्ही अंडे एका वाडग्यात फोडून घेतले व त्यात मीठ आणि रेड चिली सॉस घालून चांगले बीट करून घेतले.
- 5
डो मधील लहान गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटली. तिला सर्व बाजूंनी तेल लावून त्यावर मैदा भुरभुरला आणि सेंटर पर्यंत पिझ्झा कटरने कट करून घेतले. एक साईडने गोल करत त्याचा रोल बनवला.
- 6
तो रोल मध्ये बोटांनी प्रेस करून त्याचा गोल बनवून परत त्याची पातळ पोळी लाटली. तव्यावर थोड्या तेलावर दोन्ही बाजूंनी शेकून घेतली.
- 7
गॅसवर पॅन गरम करून ग्रिसींग करून घेतला. त्यावर अंड्याचे बॅटर निम्मे ओतून त्यावर लगेच पोळी घालून हलक्या हाताने प्रेस केले. त्याची अंड्याची बाजू ही व्यवस्थित शेकून घेतली.
- 8
आता तयार अंड्याची पोळी पोळपाटावर घेऊन त्यावर तयार टोमॅटोचे मिश्रण पसरविले मग सेंटरला सॅलड चे मिश्रण घालून त्याचा रोल बनवला.
- 9
तयार अंड्याचा रोल सेंटरला तिरपा कट करून डिशमध्ये ठेवून सर्व्ह केला. हा राजस्थानी पद्धतीचा एग रोल चवीला फारच सुंदर लागतो त्याची पोळी लच्छा पराठ्यासारखी बनवल्यामुळे सॉफ्ट छान बनते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खजूर केक
# गोडहिवाळ्यात थंडीच्या दिवसात खजूर उष्ण असल्यामुळे ते खाल्ले जावेत म्हणून मी आज खजूर केक बनविला आहे. Deepa Gad -
-
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
चिज कोबी रोल
#किड्स रेसिपी ही रेसिपी बनवायला सोपी सुटसुटीत झटपट होणारी आहे तसेच, पौष्टीक आहे..बऱ्याच लहान मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येत असतो...त्यामुळे तीच भाजी मुलांना आकर्षित करून पोटात ढकलणे गरजेचे असते त्यासाठी ही किड्स स्पेशल रेसिपी मी समाविष्ट करत आहे💯👍🏼👩🏻🍳 Pallavii Bhosale -
नानकटाई
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट, आईस्क्रीम असं काहीतरी खूप आवडतं. तर आज मी खास नानकटाई बनविली आहे. Deepa Gad -
स्पेशल समर ड्रिंक
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते. Sumedha Joshi -
वॉलनट बाकलावा रोल (walnut baklava roll recipe in marathi)
#walnuttwistsहे एक टर्कीचे प्रसिद्ध डेझर्ट आहे. ह्याचे खुप प्रकार तिथे मिळतात.माझा मुलगा नोकरी निमित्त तीकडे होता तेंव्हा आंम्हाला बाकलावाचे बरेच प्रकार टेस्ट करण्याचा व जवळून रेसिपी पाहण्याचा योग आला. ह्यात वॉलनट चा वापर केल्याने आपणास रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, ओमेगा ३, स्मरणशक्ती वाढते असे बरेच फायदे होतात. Sumedha Joshi -
-
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
न्यूटेला डोरा केक !!
#किड्सखास मूलांना आवडणारे, डोरेमॉन च्या आवडीचे, डोरीयाकि किंवा डोरा केक तयार करुया. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
बटाटा केक
#उपवास#TeamTreesउपवासाच्या दिवशी वाढदिवस आला तर काय कराल, सोप्पं आहे हा बटाटा केक बनवा, चविष्ट आणि साध्या पध्दतीने बनवतां येणारा. Sharayu Tadkal Yawalkar -
टोमॅटो कॅरट सूप:
• खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र आणि लसूण घालून परतावे. ५-७ सेकंदानी कांदा घालावा. कांदा थोडासा पारदर्शक झाला कि खगाजर घालावे.• गाजर घातल्यावर झाकण ठेवून गाजर नरम होईस्तोवर शिजवावे. नंतर टोमॅटोचे तुकडे घालून झाकण ठेवून शिजवावे. टोमॅटो मउसर झाले कि बेसिल पाने घालावीत. झाकण न ठेवता २-३ मिनिटे शिजवावे. गॅस बंद करून मिश्रण ५-१० मिनिटे कोमट होवू द्यावे.• तमालपत्र काढून टाकावी. गाजर-टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करावी. हि पेस्ट गाळण्यातून गाळून घ्यावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. नंतर गाळलेले सूप परत पातेल्यात घ्याव• मीठ, साखर, आणि लाल तिखट घालावे.१-२ मिनिटे कमी आचेवर गरम करावे आणि लगेच सर्व्ह करावे.सर्व्ह करताना लागल्यास थोडी मिरपूड घालावी. Meera Chorey -
-
-
एग रोल
#goldenapron3 #12thweek#lockdown egg ह्या की वर्ड साठी एग रोल बनवला आहे.माझ्या मुलांची फेवरेट रेसिपी.बाहेर ह्यासाठी मैद्याच्या पोळ्या वापरतात पण मे घरी रात्रीच्या शिल्लक पोळ्या.पराठे वापरते. Preeti V. Salvi -
पिझ्झा कप्स
#किड्स पिझ्झा कप्स आयत्या वेळेस ओव्हन बिघडला.....मग काय आजचा मेनू तर झालाच पाहिजे. पिझ्झा कप्स इन अप्पे पात्र Vrushali Patil Gawand -
मसूर डाळी चा पौष्टिक सूप
# #कडधान्य आज आपण करतोय अक्ख्या मसूर डाळी चा सूप ..मसूर च्या आपण बऱ्याच रेसिपीस करतो पण सूप नाही करत.. करायला सोप्पं आहे आणि मसूर डाळीत cholesterol कमी प्रमाणात असल्या मुले खूप पौष्टिक सुद्धा आहे सोबत, Low calories आणि परफेक्ट Diet रेसिपी आहे..तर नक्की try करा . Monal Bhoyar -
मुशी मसाला
#सीफूड#एनीफिशकरीआज मी मुशी म्हणजेच मला वाटतं त्या माश्याला शार्क मासा म्हणतात त्याची करी बनविली आहे. मालवणीमध्ये म्होरीचा म्हावरा म्हणतंत. बघा तुम्हाला आवडते का...... Deepa Gad -
कुळथाचे शेंगोळे (kulithache shengole recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
अप साईड डाऊन संत्रा केक
पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक..... Deepa Gad -
पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे. Sumedha Joshi -
एनर्जी बुस्टर
#पालेभाजी रविवारी शेतातील ताज्या पालेभाज्या मिळाल्या एडवन मधे मग काय घेतल्या न पिशव्या भरुन भरुन. मला फक्त मेथीची भाजी आवडते. मग बाकिच्या भाज्या माझ्या कडे बघून बोलु लागल्या. काय करणार आहेस आमच? मग विचार केला आज करू ह्याच पण काय तरी आणि बनवले पालेभाजी च एनर्जी बुस्टर Swara Chavan -
पोडी चटणी/मोलगापोडी/गन पावडर
कोणत्याही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मधे गेल्यावर मी आधी काय आँर्डर करते तर पोडी इडली. त्यावरचा ती पोडी चटणी आहाहा😋बरेचजण त्या चटणीला #गनपावडर,पोडीमसाला,मोलगापोडी अशा नावांनी ओळखतात.पर नाम मे क्या रख्खा है हमे तो बस टेस्ट से मतलब😀😊नाही का.माझा घरचा आधीचा पोडी चटणीचा स्टाँक संपला होता मग आज लगेच मुहूर्त लावलाच आणि नविन स्टाँक रेडी😊हवी आहे ना रेसिपी मग घ्या लिहुन😊😊 Anjali Muley Panse -
-
-
करवंदाचा मुरंबा (Karvandacha Murabba Recipe In Marathi)
#मुरंबाकरवंदाच्या डोंगराची काळी मैना असे म्हणतात.हा रानमेवा आहे.ह्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.ह्यातील व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते.आम्लपित्त, उलटी, मळमळ ह्यांच्या साठी उपयुक्त.असे खुप फायदे आहेत म्हणून सझिनमधे म्हणजे उन्हाळ्यात करवंद नियमीत खावीत. Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या