समोसा (samosa recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली.

समोसा (samosa recipe in marathi)

#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
8-10 सर्विंग
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 2 टेबलस्पूनकाजू बदाम भरड
  3. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  4. 1 टेबलस्पूनधनेजिरे पूड
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. कोथिंबीर
  8. 1बारीक चिरलेला कांदा
  9. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  10. कढीपत्ता
  11. तेल तळणीसाठी
  12. पारी साठी चे साहित्य
  13. मीठ चवीनुसार
  14. 3 टेबलस्पूनतेलाचे मोहन
  15. 1 टेबलस्पूनओवा
  16. 400 ग्राममैदा

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    सर्व प्रथम साहित्य घ्या.बटाटे साल काढून घ्यावे. मसाले ही काढावेत.

  2. 2

    पारी साठी प्रथम पिठ भिजवून ठेवावे. त्याकरता एका पसरट भांड्यात मैदा, ओवा मीठ घालून घ्यावे. तेलाचे किंवा तूपाचे थंड आणि पातळ मोहन घालावे व कोरडेच एकत्र करून घ्यावे कोरडेच लाडू बनवता येइल असे मोहन घालावे. थोडे थोडे पाणी घालून मळावे.

  3. 3

    घट्ट गोळा बनवावा व झाकून ठेवावे. आता आतील सारनाकरता कढईत तेल गरम करत ठेवावे आता यात कढीपत्ता घालून फोडणी करावी नंतर त्यात कांदा घालून ट्रान्सपरंट होईपर्यंत हलवत रहा.

  4. 4

    कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यात सर्व मसाले मीठ टाकून घ्यावे व परतवावे त्यानंतर त्यात बटाटे कुस्करून घालावे.

  5. 5

    सर्व भाजी व्यवस्थित एकत्र करावे आणि त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून घ्या. आता पारीच्या पिठाचे गोळे बनवून घ्यावे व गोलाकारात लाटावेत.

  6. 6

    मधोमध कापून घ्यावे. दोन्ही हातात पकडून आईसक्रीम च्या कोन प्रमाणे कोन करून घ्या. दोन्ही कडा पाणी लावून चिटकवाव्या म्हणजे समोसा फुटत नाही.

  7. 7

    आता त्यात सारण भरून पुन्हा वरच्या बाजूला पाणी लावून कडा बंद कराव्यात. अशा प्रकारे सर्व समोसे बनवून घ्यावे.

  8. 8

    तेल गरम करत ठेवावे मध्यम आचेवर तळून घ्या. छान कुरकुरीत झाले की काढून घ्यावे व निथळून घ्यावेत. तयार आहेत समोसे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes