समोसा पापड  रोल इनोव्हेटिव्ह

Spruha Bari
Spruha Bari @chayya

#ब्रेकफास्ट
उडीद पापड भाजून,तळून सर्वानाच आवडतो.मसाला पापड तर अतिप्रिय. ही पापडाची आवड लक्षात घेवून पापड मध्ये समोसा सारण भरून हे इनोव्हेटिव्ह समोसा पापड रोल हे फ्युजन बनविले बघा आवडत का?
फारच चविष्ट बनतात.

समोसा पापड  रोल इनोव्हेटिव्ह

#ब्रेकफास्ट
उडीद पापड भाजून,तळून सर्वानाच आवडतो.मसाला पापड तर अतिप्रिय. ही पापडाची आवड लक्षात घेवून पापड मध्ये समोसा सारण भरून हे इनोव्हेटिव्ह समोसा पापड रोल हे फ्युजन बनविले बघा आवडत का?
फारच चविष्ट बनतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५मिनिटे
  1. उडीद पापड
  2. सारणासाठी -. उकडून कुस्कर्लेले बटाटे
  3. कांदा बारीक चिरून
  4. १चमचाआले लसूण पेस्ट
  5. १चमचातिखट
  6. १चमचागरम मसाला
  7. चमचा 1हळद
  8. १/२चमचाजिरे
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. १.५चमचातेल सारणासाठी
  12. ग्रॅम २५०तळण्यासाठी
  13. ८चमचेकॉर्न फ्लोअर
  14. कोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

२५मिनिटे
  1. 1

    प्रथम सारण बनविण्यासाठी तेल तापवून जिरे घालावे मग कांदा परतून आले लसूण पेस्ट परतावी आता तिखट,मीठ,हळद,गरम मसाला घालून मिक्स करावे मग कुस्करले ला बटाटा घालून मिक्स करावे छान हलवून मंद गॅसवर झाकण ठेवून वाफ घ्यावी सारण तयार. कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी घालून कालवून पातळ मिश्रण करावे

  2. 2

    उतरून गार झाले की बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे पापड पाण्याचा हात लावून ओला करावा व पोळपाटावर ठेवावा त्यावर सारण भरून फोटो प्रमाणे रोल करून कडा नीट दुमडून चिटकून घ्याव्या पापड चिकट असल्याने चिकटतात थोडे कॉर्नफ्लोअर पेस्ट चे बोट फिरवले तरी पॅक होतात

  3. 3

    याप्रमाणे रोल करून घ्यावे

  4. 4

    आता मध्यम गॅसवर तेल तापत ठेवावे तयार रोल कॉर्न फ्लोअर मिश्रणात घोळवून घ्यावे

  5. 5

    गरम तेलात रोल सोडावा

  6. 6

    छान दोन्ही बाजूने कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यावेत

  7. 7

    याप्रमाणे रोल तळून घ्यावे

  8. 8

    गरमागरम सॉस किंवा चटणी बरोबर शेव,कांदा,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Spruha Bari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes