गाजर हलवा रोल

Maya Ghuse
Maya Ghuse @maya3636
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मी
3 सर्व्हिंग्ज
  1. ४ गाजर किसून
  2. १०० ग्रॅम तूप
  3. ५० ग्रॅम दूध पावडर
  4. बारीक कापलेले बदाम,पिस्ते,काजू इच्छानुसार
  5. १ लहान चमचा विलायची पावडर
  6. 2 चमचेमध
  7. कपदूध १/२
  8. 2वाट्या साखर
  9. ८ ते १०ब्रेडचे स्लाइस
  10. १ कप ब्रेड क्रम्स

कुकिंग सूचना

30मी
  1. 1

    प्रथम एका कढईत तूप तापवून मंद आचेवर गाजरचा किस चांगला परतवून घ्या. गाजराचे पाणी सूकत आले की दूध घालून शिजवा नंतर दूध पावडर, साखर व बारीक केलेले बदाम, पिस्ते, काजू घाला व तूप सुटू लागल्यावर आच बंद करा

  2. 2

    आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हलक्या हाताने लाटने फिरवून घ्या आता लाटलेले ब्रेड स्लाइस कोमट दूधात घोळवून घ्या

  3. 3

    मग त्यात गाजर हलवा भरुन त्या ब्रेड स्लाइस बंद करुन गोल वळून घ्या, ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घट्ट वळून घ्या ह्या पद्धतीने सर्व गाजर हलव्याचे गोलाकार रोला बनवून घ्या व ब्रेडक्रम्समध्ये घोळवून घ्या

  4. 4

    कढईत तूप तापवून, मंद आचेवर सर्व गाजर हलवा रोल शैलोफ्राय करून घ्या व त्यावर मधाची धार सोडून ड्रायफ्रूट टाकून गरमागरम आस्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Maya Ghuse
Maya Ghuse @maya3636
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes