रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
८ ते दहा व्यक्तींसाठी
  1. १०_१२ सुके बोंबील
  2. ८_१० लसूण पाकळ्या
  3. हिरव्या मिरच्या
  4. अर्धी वाटी कढीपत्ता पाने
  5. पाव वाटी तीळ
  6. पाव वाटी शेंगदाणा
  7. अर्धी वाटी खोबरे
  8. अगदी थोडेसे मिठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    वरील सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यावे. सुका बोंबील विस्तवावर भाजता आला तर अहाहा.... पण मुंबई सारख्या शहरामध्ये शक्य नाही, तेव्हा मी गॅस वरच मंद आचेवर पापडाची जाळी ठेवून भाजले. ही मूळ वाडव‌‌ळ पाककृती आहे, यात मूळ रेसिपी मध्ये शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता, खोबरे नसते. पण छान थंडी पडू लागली आहे, तेव्हा शरीराला नैसर्गिक तेल मिळणे आवश्यक असते. म्हणून थोडा ट्विस्ट... याने चव मात्र आणखी छान झाली.... प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजला आहे कारण प्रत्येकाची वेगवेळ्या तापमानावर शिजण्यााठी क्षमता आहे.

  2. 2

    भाजलेले पदार्थ थंड होऊ द्या. आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. सुक्या बोंबील ला मीठ असते, तेव्हा मीठ अगदी बेतानेच घाला... मूळ पाककृती मध्ये माझी आई मुळीच मीठ घालीत नाही, पण मी येथे तीळ, शेंगदाणे, कढीपत्ता, खोबरे वापरले आहे तेव्हा त्यांची लज्जत वाढवण्यासाठी चिमुटभर मीठ वापरले.

  3. 3

    चला आपली तोंडाला पाणी सुटणारी सुकट तिखट तयार.... मांसाहारी खवय्यांसाठी खास आगळीवेगळी सुकट तिखट चटणी तयार.. पुन्हा सर्व पदार्थ नीट भाजलेले असल्याने ही चटणी पंधरा वीस दिवस सहज टिकते... भात, भाकरी, बिर्याणी, पुलाव, चपाती अगदी काहीही असो... त्यांची ही जीवाभावाची सखी त्यांना चविष्ट बनवण्यासाठी तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes