कुकिंग सूचना
- 1
प्रथम लागणारे वरील सर्व साहित्य एका बाजूला काढुन घेतले.
- 2
कांदा बारीक चिरून घेतला आणि तेलात गुलाबीसर परतून घेतला. आणि मिक्सर मध्ये त्याची पेस्ट बनून घेतली.
- 3
मगज बी, काजू तेला मध्ये गुलाबीसर परतून घेतले आणि तीळ घालून मिक्सर मध्ये त्याची पेस्ट बनवून घेतली.
- 4
टोमॅटो ची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, आणि पनीर चे तुकडे करून घेतले. थोडेसे पनीर बारीक किसून घेतले, ग्रेव्ही साठी.
- 5
आता बेसिक तयारी झाली, आता सुरुवात करूया भाजी करायला. सुरवातीला तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले की त्या मध्ये तमालपत्र, विलायची, लवंग घातली.
- 6
आता त्या मध्ये टोमॅटो पेस्ट घातली व तेल सुटू पर्यंत चांगले परतून घेतले.
- 7
आता त्यात लालतिखट, मीठ, गरम मसाला, हिरव्या मिरचीची पेस्ट, कस्तुरी मेथी व लाल मिरची घातली.
- 8
आता दुसरी कडे मी गाजर चिरून थोडे वाफळायला ठेवले. (तुम्हाला हवे असल्यास टाकणे किंवा इतर अजून भाज्या तुम्ही आवडी नुसार वाढवू शकता)
- 9
आता कढई मध्ये कांदा पेस्ट घातली. थोडी परतून झाली की काजू- मगज- तीळ यांची केलेली पेस्ट घातली व रंग बदलू पर्यंत परतून घेतले.
- 10
आता त्या मध्ये खवा आणि माखनी मसाला घालून परतून घेतले.
- 11
आता पनीर, काजू आणि गाजराचे तुकडे घातले. लगेच किसलेले पनीर घातले व साखर घातली.
- 12
आता 5 ते 10 मिनिट गॅस मंद आचेवर ठेवला. त्याचा कलर बदलला की गॅस बंद केला.
- 13
आता भाजी तयार आहे. गरम गरम भाजी पोळी, रोटी, नान सोबत छान लागते. भाजी सर्व्ह करताना वरून ताजी मलाई/क्रीम टाकावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
-
शाही पनीर (Shahi paneer recipe in marathi)
#फॅमिली आपल्या परिवाराच्या असतो आपण अनभिषिक्त सम्राज्ञी आणि आपला परिवार असतो आपल्यासाठी ‘शाही’ परिवार. मग आपल्या परिवाराच्या आवडीच्या डिशचे सुद्धा ‘शाही’ लाड व्हायलाच हवेत. माझ्या शाही परिवारास ही ‘शाही पनीर’ ची रेसिपी डेडीकेट करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
-
पनीर-मटार राईस
#goldenapron3#week10#keyword riceसध्या lockdown मुले वणपोट रेसिपी च उत्तम आहे। तेंव्हा त्या राईस मध्ये पनीर आणि मटार असले की अजून काय हवे। Sarita Harpale -
कढई-पनीर (PANEER RECIPE IN MARATHI)
#cooksnap नप घरातील आवडती रेसिपी आहे. खास पाहूणे येणार असतील,किंवा नेहमीच्या भांज्याचा कंटाळा आला की पनीर कढई भाजी करते.......। Shital Patil -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मधली १० वी रेसिपी आहे ती म्हणजे पालक पनीर । पावसाळ्यात सर्वानां पालक नेहमी मिळतेय ,पालकामध्ये लोह प्रमाण भरपूर असल्यामुळे पालकाची विविध रेसिपीस बनवता येते, आणि जवळजवळ सर्वांनचीच पालक आवडती हिरवी भाजी असते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Jyotshna Vishal Khadatkar -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#MBRघरच्या घरी बनवा पनीर मसाला.लहान मुल तर खूप आवडीने खातात. Padma Dixit -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brशाकाहारी जेवणामध्ये पनीर हा त्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे पनीर पासून खूप सगळे पदार्थ बनवता येतात मी आज पनीर बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेव्हेज बिर्याणी मध्ये पनीर बिर्याणी माझी फेवरेट आहे अचानक पाहुणे आल्यावर ही पटकन बनवता येते घरच्या साहित्यातून झटपट बनवता येणारी ही पनीर बिर्याणी ची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे Smita Kiran Patil -
पनीर बटर मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (paneer butter masala recipe marathi)
मलई रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनविणे सोपे आहे.पनीर बटर मसाला ही भारतीय पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पनीर रेसिपी आहे. त्याच्या ग्रेव्हीचे मसालेदारपणा आणि क्रीमयुक्तपणाचे जवळजवळ परिपूर्ण संयोजन कोणत्याही भारतीय पदार्थाबरोबर सर्व्ह करणे केवळ अपूरणीय आणि अष्टपैलू बनवते. आपण ते तंदुरी रोटी, नान आणि पनीर कुल्ल्याबरोबर वा वाफवलेल्या तांदळाबरोबर सर्व्ह कराल पनीर बटर मसाला किंवा बटर पनीर ही एक अतिशय लोकप्रिय करी आहे. Amrapali Yerekar -
मलाई पनीर.. (malai paneer recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर रविवार-पनीर पनीर ,छेना cottage cheese.. दुधापासून निर्माण करण्यात आलेला अतिशय स्वादिष्ट मुलायम पदार्थ.. पनीर हे उत्तर भारत आणि पूर्व भारत म्हणजेच काश्मीर ,पंजाब ,पश्चिम बंगाल मधील खाद्यसंस्कृती मधला एक महत्त्वाचा घटक.. खरं पनीर हे मुळात प्रथम कुठे अस्तित्वात आले हा वादाचा मुद्दा आहे पण आपल्याला काय करायचे अशा वादाच्या मुद्द्यात आपण न पडलेलं बरं.. आम खाओ.. गुठलिया मत गिनो..ज्यांना दूध प्यायला आवडत नाही किंवा दूध पचत नाही अशांसाठी पनीर हे एक वरदानच आहे तसंच वजन कमी करण्यासाठी , वजन वाढवण्यासाठी पण...गेल्या वीस-बावीस वर्षातील हॉटेल संस्कृतीमुळे पनीर अगदी घराघरात जाऊन पोहोचले आहे.. पनीरच्या चवीमुळे आणि स्वादा मुळे तर सणा समारंभातही पनीरची उपस्थिती अनिवार्य ठरली आहे आणि आमच्या घरातही.. त्यामुळे फ्रिजर मधला एक गप्पा मला पनीर साठी कायम राखून ठेवावाच लागतो आणि घरातल्यांच्या जिभेचे चोचले पुरवावे लागतात. आता तर काय युट्युब, गुगल ,रेसिपी बुक्स,मुळे रेसिपीसाठी Sky is the limit झालंय.. त्यामुळे सदैव आपल्याला पनीरच्या गोड तिखट खमंग अशा रेसिपीज बघायला मिळतात.. चला तर मग आज आपण मऊसूत पनीरच्या बरोबर मुलायम क्रीमची गट्टी जमवुया आणि त्यांचे लाजवाब असे जुळलेले सूर किती रंगत आणतात ते पाहूया.. Bhagyashree Lele -
"शाही क्रिमी पनीर" (shahi creamy paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword_shahipaneer"शाही क्रिमी पनीर" पनीर प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो... त्यातील ही एक शाही डिश.. नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#GA4 #week1पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. Sampada Shrungarpure -
पनीर दो प्याजा (paneer do pyaaza recipe in marathi)
#cooksnapchallenge#week1पनीर ही लहान मुलं पासून मोठ्या पर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ. पनीर मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने पण असतात.पाहूया पनीर दो प्याजा. kavita arekar -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल#week2#पनीर लबाबदार आज मी रक्षाबंधन स्पेशल साठी पनीर ची वेगळी भाजी केली आहे. खूप छान रेस्टॉरंट स्टाईल अशी भाजी बनते. चला तर मग रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
शाही पनीर(shahi paneer recipe in marathi)
आता या लॉकडाउनच्या पिरेड मध्ये प्रत्येक दिवस हा रविवार वाटून राहिला आणि रोज संध्याकाळी काय बनवायचं हा प्रश्नच असतो तसा माझ्याकडे नॉनव्हेज खूप आवडतो पण ते आपण रोज बनवू शकत नाही आणि रोज संध्याकाळचं जेवण हे खूप छान असायलाच पाहिजे माझ्या घरी तर मग आज विचार केला काय बनवायचं काय बनवायचं व पनीर आठवलं पण पनीरचा नेहमी बटर पनीर मसाला वगैरे असं करत असते पण यावेळेस म्हटलं चला थोडी त्याची पण थोडी पद्धत बदलून आपण शाही पनीर म्हणून करून बघायचे आणि काय बघता हो खूपच सुंदर भाजी झाली आहे सर्वांना आवडली घरचे सर्वे सगळेच खूष आहेत Maya Bawane Damai -
-
पनीर माखनवाला (paneer makhanwala recipe in marathi)
माझ्या घरी पनीर म्हणजे खूपच मी ग्रेट आहे मी शक्यतो पनीरचे सर्वच प्रकार घरीच बनवते आणि घरच्यांना हॉटेल पेक्षाही घरचीच भाजी खूप छान लागते म्हणतात की मोठे मोठे हॉटेल ची भाजी तुझ्यासमोर फिकी आहे त्यामुळे मला कधीच हॉटेलला जायलाच मिळत नाही Maya Bawane Damai -
पनीर कुर्मा करी (paneer kurma curry recipe in marathi)
#GA4 #Week26Korma या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. आंबट गोड मलाईदार पनीर कुर्मा करी मस्त तर होते तसेच पटकन तयार होते. Rajashri Deodhar -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
काजू-पनीर मसाला
#पनीरपनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी... Deepa Gad -
पनीर अफगाणी (Paneer Afghani Recipe In Marathi)
#JLR पनीर हे बऱ्याच अंशी आपल्या जेवणामध्ये वापरलं जातं त्यामुळे पनीरच्या विविध रेसिपी ट्राय करून बघणं हे मला आवडतं आजची रेसिपी ही तशीच काहीशी वेगळी आणि चविष्ट आहे पनीर अफगाणी एक वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. चला तर आज बनवूयात आपण पनीर अफगाणी Supriya Devkar -
-
पनीर लबाबदार - रेस्टॉरंट स्टाईल (paneer lababdar recipe in marathi)
#पश्चिम #पंजाब#पनीरपश्चिम भारत रेसिपीजपनीर हे सगळ्यात जास्त आवडणारे सगळ्यांना. हेलथी आणि रिच इन प्रोटीन. Sampada Shrungarpure -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर दो प्याजा (paneer do pyaza recipe in marathi)
#rr#पनीरपनीर दो प्याजा म्हणजे नेहमीपेक्षा या ग्रेव्ही मध्ये या भाजीमध्ये जास्ती कांदा वापरलेला असतो Suvarna Potdar
More Recipes
टिप्पण्या