गुड गप्पा

Renu Chandratre
Renu Chandratre @cook_20490704

#गोड गुड गप्पा किंवा गूळ गट्टा , गुळा पासून बनवलेला फारच चविष्ट आणि पौष्टिक गोड पदार्थ आहे. अगदी पाच मिनिटाच्या आत फक्त दोन साहित्याने हा पदार्थ बनविला जातो. मार्केटच्या कुठल्याही चॉकलेट पेक्षा गुड गट्टा खूपच चविष्ट आणि पौष्टिक तर आहेच, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा दिला जाऊ शकतो. जेवल्यानंतर थोडासा गोड खायची इच्छा झाली तर हा खूपच चांगला पर्याय आहे. मी जेव्हा लहानपणी शाळेत जायचे तेव्हा शाळेच्या सुटीत, शाळेच्या गेटच्या बाहेर एक फेरीवाला बसायचा चिंचवड शेंगदाणे उकडलेले मटार आणि हा गूळ गट्टा पण आणायचा. आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी त्याच्याकडे पदार्थ विकत घेऊन खूप मजेने खायचं.. अगदी एक रुपयात भरपूर गूळ गप्पा मिळायचा.अजून सुद्धा लहानपणीचे ते गोड दिवस आठवतात बनवायला आहे आणि अगदी झटपट होतो तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना हा पदार्थ नक्की खाऊ घाला नक्की आवडेल... चला तर मग बघुया याची साधी सरळ सोपी कृती

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी बारीक चिरलेला गूळ
  2. 1 छोटा चमचा खायचा सोडा
  3. १/२ छोटा चमचा तूप किंवा तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य एकत्र करा, एका कढईमध्ये मंद आचेवर सतत ढवळत वितळायला ठेवा.. गुठळ्या राहू देऊ नका. आता यात सोडा टाका

  2. 2

    सोडा घातल्यावर सतत ढवळत राहा आणि गॅस बंद करा. प्लॅटफॉर्म स्वच्छ करून त्याच्यावरती तेलाचा किंवा तुपाचा हात फिरवून घ्या. तयार मिश्रण पटकन त्याच्यावर होता आणि चमचा न लावता मिश्रण स्वतः आपोआप पसरू द्या. दहा मिनिटं असंच गार आणि कडक (सेट) होईपर्यंत सोडून द्या.

  3. 3

    गूळ गट्टा तयार आहे, त्याचे ओबड-धोबड तुकडे करून घ्या संपुर्ण पणे गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. आणि लागेल तसा खाऊन आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Renu Chandratre
Renu Chandratre @cook_20490704
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes