गुळाचे शंकरपाळे (gudache sankarpale recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#GA4 #week15 #गुळ
दिवाळीमध्ये शंकरपाळे हा पदार्थ आपण बनवतो आणि तो बर्‍याच जणांना खास करून मुलांना खूपच आवडतो. हेच शंकरपाळे साखर न वापरता,थंडीच्या दिवसात खाण्यासाठी म्हणून गुळ वापरून बनवले आहेत. गुळाची सुंदर चव आल्यामुळे ते खूपच टेस्टी लागतात. पटकन होणारे हे शंकरपाळे नक्की करून बघा.

गुळाचे शंकरपाळे (gudache sankarpale recipe in marathi)

#GA4 #week15 #गुळ
दिवाळीमध्ये शंकरपाळे हा पदार्थ आपण बनवतो आणि तो बर्‍याच जणांना खास करून मुलांना खूपच आवडतो. हेच शंकरपाळे साखर न वापरता,थंडीच्या दिवसात खाण्यासाठी म्हणून गुळ वापरून बनवले आहेत. गुळाची सुंदर चव आल्यामुळे ते खूपच टेस्टी लागतात. पटकन होणारे हे शंकरपाळे नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 3 टेबलस्पूनतूप
  3. 1 कपबारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/4 टीस्पूनखायचा सोडा
  6. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यामध्ये एक कप मैदा घेउन त्यात चिमुटभर मीठ, त्यामध्ये तीन टेबलस्पून तूप त्याचप्रमाणे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून नीट मिक्स करून घ्या. त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून नरम पीठ भिजवून पाच ते दहा मिनिटे बाजूला झाकून ठेवा.

  2. 2

    ते मिश्रण व्यवस्थित मळून त्याचा गोळा बनवून लाटून तुमच्या आवडीप्रमाणे शंकरपाळे कापून घ्या. तेलामध्ये शंकरपाळी लालसर रंगावर तळून घ्या (तळताना आधी गॅस मंद ते मिडीयम आचेवर ठेवा, नंतर मोठा करून लालसर रंगावर तळून घ्या)

  3. 3

    चिरलेला गूळ जाड बुडाच्या भांड्यात घेऊन मंद गॅसवर हळूहळू विरघळवा,गूळ वितळत असताना सतत हलवत रहा. थंड पाण्यामध्ये टाकून त्याची कडक गोळी तयार होते का बघा साधारण चार ते पाच मिनिटानंतर गोळी तयार होते.या स्टेजला गॅस बंद करून तळलेले शंकरपाळे त्या गुळामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करा. साधारण थंड होत आले की हाताने शंकरपाळे वेगवेगळे करून घ्या.

  4. 4

    खुशखुशीत शंकरपाळे तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
खुप छान हेल्दी गुळाचे शंकरपाळे😋👌

Similar Recipes