रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

12 - 15 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमभाजीचा गाजर
  2. 0.5 लिटरपाणी
  3. 3 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  4. 150 ग्रॅमसाखर
  5. चिमूटभरवेलची पावडर
  6. अवश्यक्तेनुसार डेसिकेटेड कोकोनट
  7. सजावटीकरिता पिस्तापूड

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम गाजराचे नीट धुवून साल काढून मोठे तुकडे करुन घ्यावेत.

  2. 2

    गैसवर मध्यम आचेवर एका पॅनमध्ये गाजराचे तुकडे घेउन त्यात अर्धा लिटर पाणी घालुन शिजवून घ्यावे. शिजल्यानंतर पाणी निथळून त्या गाजराची पेस्ट करुन घ्यावी.

  3. 3

    दुसर्या कढईमध्ये तयार गाजराचा पल्प घेवून त्यात साखर आणि वेलची पूड घालुन पुन्हा एकदा नीट परतून घ्यावे. नंतर त्यात उरलेले गाजराचे पाणी आणि काॅर्नफ्लोअर घालुन मध्यम आचेवर घट्ट होई पर्यंत ढवळत रहावे.

  4. 4

    नंतर तयार मिश्रण एका काचेच्या भांड्याला तुप लावुन त्यात काढून घ्यावे. आणि त्याला प्लास्टिक पेपर ने रॅप करुन 6 तास किन्वा रात्रभर न हलवता ठेवून द्यावे.

  5. 5

    नंतर त्याचे वड्या पाडून आवडीप्रमाणे आकार द्यावा.

  6. 6

    तयार आकार डेसीकेटेड कोकोनट मध्ये घोळवून वरुन पिस्ता पूड लावून सर्व्ह करावे.

  7. 7

    गाजर बर्फी खाण्यास तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes