फ्रुट आईस गोला

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#किड्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १/२ लीटर पाण्याचा बनवलेला गोळा
  2. संत्र्याच्या लेअर साठी
  3. १ वाटी संत्र्याचा रस
  4. १ टेबलस्पून साखर
  5. १ टीस्पून लींबू रस
  6. १ टीस्पून मीठ
  7. १ टीस्पून आले पेस्ट
  8. १/२ टीस्पून जिरे पूड
  9. १/३ टीस्पून संत्रि झेस्ट
  10. कलिंगडाच्या लेअर साठी
  11. १ वाटी कलींगडाचा ज्यूस
  12. १ टेबलस्पून साखर
  13. १ टीस्पून काळमीठ
  14. १/२ टीस्पून जिरे पूड
  15. २ टीस्पून लींबू रस
  16. द्राक्षाच्या लेअर साठी
  17. १ वाटी द्राक्षाचा रस
  18. १ टेबलस्पून साखर
  19. १/२ टीस्पून मीठ
  20. १/२ टीस्पून काळ मीठ
  21. १/२ टीस्पून जिरे पूड
  22. १ टीस्पून चाट मसाला व काळमीठ वरती भूरभूरण्या साठी
  23. १/४ टीस्पून दालचिनी पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    पॅनमध्ये संत्र्याचा रस,साखर, लींबू रस मीठ, काळमीठ आलपेस्ट,जीरपुड संत्रा झेस्ट सर्व साहित्य घालून परतून जरा दाट केले.

  2. 2

    आता कलींगडाचा ज्यूस मीठ साखर काळमीठ लींबू रस जीरपूड सर्व पॅनमध्ये घालून घट्ट सर आटवून घेतले.

  3. 3

    द्राक्षाच्या लेअर साठी द्राक्षाचा रस, साखर, मीठ, लींबू रस, दालचिनी पूड, जीरपुड सर्व पॅनमध्ये घालून आटवून दाटसर केले.

  4. 4

    आता तीनही लेअर तयार झाले.

  5. 5

    आता फ्रीजर मधील बर्फ काढून तो फोडून मग मीक्सरवर इंचरवर क्रश केला. व तो ग्लासमधे दाबून भरतांनाच त्यात सेंटरला उभी काडी घातली.असे दोन्ही ग्लास करून घेतले.थोडे फ्रीजमध्ये ठेवून लगेच बाहेर काढून त्यावर तीन्ही लेअर घातले. व त्यावर चाट मसाला व काळमीठ वरुन भूरभेरले.

  6. 6

    आता सजावटीसाठी द्राक्ष कलिंगड, अंजीर,संत्र ह्यांचे पीसेस दोन साच्यांनमधे घालून त्यात पाणी घालून ते फ्रीजरमधे सेट करून काढून घेतले. मग डीशमधे फळांच्या फोडी, सेट केलेले फळांचे साचे व तीन रंगी बर्फाचे गोळे ठेवून डीश सर्व्ह केली.

  7. 7

    हा गोळा फळांचा वापर व घरचे पाणी वापरून केल्यामुळे त्रास होण्याची भीतीही नाही कारण बर्फाचागोळा हा सगळ्यांनाच आवडतो.हा चवीला तर अतिशय अप्रतिम लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes