रव्याचे तिखट आप्पे

Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391

#रवा रेसिपी

रव्याचे तिखट आप्पे

#रवा रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १/२ कप उडीद डाळ
  2. १/२ कप इडली रवा
  3. बारीक चिरलेला कांदा
  4. बारीक चिरलेला टोमॅटो
  5. १/४ टिस्पून हिंग
  6. १/२ टिस्पून जिरे
  7. १/२ टिस्पून मोहरी
  8. १/४ टिस्पून हळद
  9. १ टिस्पून लाल तिखट
  10. चवीनुसारमीठ
  11. कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    १/२ कप उडीद डाळ एका भांड्यात घेऊन स्वच्छ धुवून घ्यावी. ५-६ तास भिजत घालावी.

  2. 2

    भिजवलेली डाळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावी.

  3. 3

    वाटलेल्या डाळीत १/२ कप इडली रवा घालावा. दोन्ही एकत्र करून थोडे पाणी घालून तयार मिश्रण आंबण्यासाठी ७-८ तास साठी ठेवून द्यावे.

  4. 4

    ७-८ तासानंतर मिश्रण आंबून तयार झालेले दिसेल.

  5. 5

    मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व मीठ घालून एकत्र करावे.

  6. 6

    गॅस वर आप्पे पॅन ठेवून गरम करून घ्यावा. तयार मिश्रण त्यामध्ये घालावे व पॅन वर ५-७ मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढावी. आप्पे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत.

  7. 7

    तयार झालेले आप्पे नारळाच्या चटणी बरोबर सुध्दा खाऊ शकतो.

  8. 8

    एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लाल तिखट व मीठ घालावे.त्यावर आप्पे घालून परतून घ्यावे. वरून कोथिंबीर घालावी.

  9. 9

    तयार झालेले तिखट आप्पे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes