हँपी हँपी बिस्किटचा केक

Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803

खुप दिवसांत केक करायची ईच्छा पूर्ण केली आज मी. Lock down मध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर घरच्या घरीच बनवा केक

हँपी हँपी बिस्किटचा केक

खुप दिवसांत केक करायची ईच्छा पूर्ण केली आज मी. Lock down मध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर घरच्या घरीच बनवा केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 4हँपी हँपी बिस्किटे पुडे
  2. 1 कपसाखर
  3. 2 कपथंड दुध
  4. 1इनो पुडी
  5. काजु,बदाम, पिस्ताचे काप

कुकिंग सूचना

45 मि.
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घेतले.

  2. 2

    सर्व बिस्कीट मिक्सरमध्ये घेऊन साखर घालून त्याची पावडर करून घेतली.

  3. 3

    केलेली पावडर एका बाऊल मध्ये काढून घेतली. दुसरीकडे कुकर मध्ये स्टँड ठेवून शिट्टी काढून बाजूला ठेवली व कुकर गँस वर कमी आचेवर गरम करण्यासाठी ठेवला.

  4. 4

    आता बाऊलमध्ये काढलेल्या बिस्कीट पावडर मध्ये थोडे थोडे दुध घालून केक बँटर तयार करून घेतले.

  5. 5

    आणि आता यामध्ये इनो घालून चांगले मिक्स करून घेतले.

  6. 6

    आता एका कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये केक बँटर घालून थोडे टँप केले कारण नीट पसरले जाईल.

  7. 7

    आता यावर काजु,बदाम, पिस्ता पसरून घेऊ आणि कुकर मध्ये ठेवून 40 मि. शिजवून घेतला. (टिप.कुकर सारखा उघडून पाहून नका)

  8. 8

    40 मि.नंतर केक तयार आहे की नाही पाहण्यासाठी एक टुथपिक घेऊन केक मध्ये घालून पाहु जर टुथपिक केक न चिकटता स्वच्छ बाहेर आली कि आपला केक तयार आहे.

  9. 9

    खाण्यासाठी तयार आहे हँपी हँपी बिस्कीट केक🎂😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes