पाणी पुरी (pani puri recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#GA4 #week26
पझल मधील पाणी पुरी हा शब्द. आमच्या कडे सर्वांना खूप आवडते. मी घरीच बनवते.मी हिरवे मूगच वापरते.चिंचेची चटणी व हिरवी चटणी मी घरीच करते.यांची रेसिपी मी माझ्या 1-2 रेसिपी मध्ये दिली आहे.

पाणी पुरी (pani puri recipe in marathi)

#GA4 #week26
पझल मधील पाणी पुरी हा शब्द. आमच्या कडे सर्वांना खूप आवडते. मी घरीच बनवते.मी हिरवे मूगच वापरते.चिंचेची चटणी व हिरवी चटणी मी घरीच करते.यांची रेसिपी मी माझ्या 1-2 रेसिपी मध्ये दिली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिटे
5 जणांसाठी
  1. 50पुरीचे पाकिट
  2. 1/2 कपचिंचेची गोड चटणी
  3. 1/2 कपहिरवी चटणी
  4. 1 कपबारीक शेव
  5. 1/2 कपतिखट बुंदी
  6. 2उकडलेले बटाटे
  7. 4 टेबलस्पूनअर्धवट शिजवलेले हिरवे मूग
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  10. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  11. साधं पाणी

कुकिंग सूचना

10-15 मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून,सालं काढून कुस्करुन घेणे. 2 टेबलस्पून हिरवे मुग 5-6 तास भिजत ठेवावे. थोडेसे मीठ व पाणी घालून अर्धवट शिजवून घेणे.

  2. 2

    चिंचेची गोड चटणी थोडे पाणी घालून पातळ करून घेणे. हिरव्या चटणीत पण थोडे पाणी घालून पातळ करून घेणे.

  3. 3

    एका वाटी मध्ये बटाटा,हिरवे मूग, मीठ, चाट मसाला,लाल तिखट घालून मिक्स करून घेणे.

  4. 4

    एका डिशमध्ये पुरी थोडीशी मध्यभागी फोडून घेणे. त्यात मिक्स केलेले मिश्रण, शेव, तिखट बुंदी थोडे घालून घेणे.

  5. 5

    खायला घेताना चिंचेचे पाणी,हिरव्या चटणीचे पाणी हवे तेवढे घालून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes