मेथी बटरी पुलाव

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#goldenapron3 week 14 methii
मेथी ही भाजी माझ्या खूपच आवडीची आहे. पण हल्ली बाहेर जाऊन ताजी भाजी आणता येत नसल्याने मी घरी असलेली कसूरी मेथी वापरली, आणि मस्त चमचमीत पुलाव बनवला.

मेथी बटरी पुलाव

#goldenapron3 week 14 methii
मेथी ही भाजी माझ्या खूपच आवडीची आहे. पण हल्ली बाहेर जाऊन ताजी भाजी आणता येत नसल्याने मी घरी असलेली कसूरी मेथी वापरली, आणि मस्त चमचमीत पुलाव बनवला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्रॅम तांदूळ
  2. २०० ग्रॅम कांदे
  3. 2 टीस्पूनकसूरी मेथी
  4. 2टोमॅटो
  5. 1सिमला मिरची
  6. 2 टीस्पूनवाटाणे
  7. 1 टीस्पूनतिखट पूड
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनमीठ
  10. 2 टीस्पूनआलं-लसूण पेस्ट
  11. 4 टीस्पूनबटर
  12. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    भात शिजवताना त्यात एक टीस्पून मीठ आणि एक टीस्पून बटर घालून, पाणी घालून कुकरमधे एक शिट्टी काढून शिजवला. मग कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची बारीक चिरुन घेतली. आणि वाटाणे धुवून घेतले. आणि आलं-लसूण पेस्ट बनवून घेतली.

  2. 2

    कढई मधे तेलात फोडणीसाठी जिरे घालून त्यात वाटाणे घालून परतले मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतला. मग त्यात कसूरी मेथी घातली, आणि आलं-लसूण पेस्ट घालून परतले.

  3. 3

    त्या कांद्यावर तिखट पूड, हळद आणि पावभाजी मसाला घालून परतले.

  4. 4

    चांगले परतून त्यात शिजवलेला भात घालून परतून त्यात बटर आणि थोडा पावभाजी मसाला आणि तिखट पूड घालून मिक्स केले.

  5. 5

    आणि सगळे परतून छान एक वाफ काढली. आणि पुलाव बनवला.

  6. 6

    वाढताना परत पुलावच्या वर बटर घातले. आणि थोडी फ्राय केलेली कसूरी मेथी घालून बटरी मेथी पुलाव सर्व्ह केला. बरोबर लिंबू, भाजलेला पापड आणि भेंडी मिरगु़ड पण सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes