मसाला रस्सा उसळ

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#फोटोग्राफी
मसाला रस्सा उसळ
आज मुल म्हणत होती की ,"आई आज काही तरी रस्सा ची भाजी बनाव, पण रस्सा भाजी बनवण्या साठी भाज्या नवत्या, अंडा करी बनाऊ म्हंटले तर अंड नवते, तर मग फ्रीज मधे बघितले तर मोड आलेले मूग होते, मूग दिसले मुलांना तर त्यांनी वाकडे तिकडे तोंड बनविले, मी मग विचार केला आणि झणझणीत रस्सा उसळ बनविते असे ठरविले, आणि केली मस्त झणझणीत उसळ, पण जेव्हा जेवली मुल तर एकदम खुश ,,म्हणतात कसे आई आता उसळ अशीच बनवीत जा आणि नेहमी बनव......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. साहित्य....
  2. 2 कपमोड आलेले मूग
  3. 2टोमॅटो ची प्युरी
  4. 1मोठा कांदा
  5. 6,7पाकळ्या लसूण
  6. 2हिरवी मिरची
  7. 1 इंचआलं
  8. 1/2 कपतेल
  9. 1 टेबलस्पूनजिरे
  10. 1 टीस्पूनमोहरी
  11. 1 चुटकीहिंग
  12. 2 टीस्पूनलाल तिखट
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 2 टीस्पूनकाळा मसाला
  15. मीठ चवीप्रमाणे
  16. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  17. 1 टीस्पूनकसुरी मेथी

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती
    कांदा, लसूण, आलं, जिरे, मिरची हे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या
    टोमॅटो प्युरी करावी
    आता गॅस चालू करून कढई ठवावी, त्यात तेल घालावे, तेल तापले की मोहरी टाकावी, ती तडतड्यावर त्या हिंग टाकावा, मिक्सर मधून काढलेले वाटण त्यात टाकावे ते चांगले गोल्डन झाले की टोमॅटो प्युरी घालावी, मग छान त्या मसाल्याला छान तेल सुरू द्यावे, तेल सुटले की तिखट, हळद, मीठ, काळा मसाला घालून चांगले 1 मिंट परतून घ्यावे, मग त्यात मोड आलेले मूग घालून चांगले परतावे आणि 2 कप गरम पाणी घालून चांगले उकळू द्यावे

  2. 2

    एक उकळी आल्यावर गॅस स्लो करून त्यावर झाकण ठेवावे, 3,4 मिंट ने झाकण उघडून परत1 मिंट झाकण न ठेवता स्लो गॅस वर उकळू द्यावे मग गॅस बंद करा, खुप रस्सा पातळ नाही करायेच आहे, आता छान त्यावर सांबार भूर्कावा....छान मसाले दार उसळ तयार आहे....शेवटी कसुरी मेथी टाकावी

  3. 3

    छान झणझणीत रस्सा उसळ भाजी तयार आहे,,गरम गरम चपाती बरोबर द्या खायला घरच्यांना...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes