चीझ मुगलेट(cheese muglet recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

जेवण प्लस नाश्ता असे हे मूगलेट आहे..
खूप छान पौष्टिक आणि मजेदार असे हे आहे,,,
तुम्हाला वाटत असेल मोड आलेल्या कडधान्यात मध्ये काय मजेदार असेल..
पण माझ्यावर विश्वास ठेवा अतिशय चांगली डिश आहे ही...
मी सहज करून,,
बघितलं मला जास्त त्या दिवशी भूक नव्हती रात्रीची...
विचार केला आमलेट करावं,
मग डोक्यातच आलं की औषध घ्यायचे आहे तर थोडं हेवी खावे लागेल,,
मग घरी मोड आलेले मूग होते,
मग डोक्यात आयडिया सुरू झाल्या..
मग अजून विचार आला की हे खूप सिम्पल होईल आणि तेवढी खायला मजा येणार नाही...
चीज होते, वा वा आता मजा येईल...
असे करत करत खूप सुंदर माझी डिश तयार झाली,,
अतिशय सुंदर झालेला आहे हे मूग लेट,,
मस्त विटामिन्स पोटात गेले,
सहज इनोव्हेट झालेली डिश,,,

चीझ मुगलेट(cheese muglet recipe in marathi)

जेवण प्लस नाश्ता असे हे मूगलेट आहे..
खूप छान पौष्टिक आणि मजेदार असे हे आहे,,,
तुम्हाला वाटत असेल मोड आलेल्या कडधान्यात मध्ये काय मजेदार असेल..
पण माझ्यावर विश्वास ठेवा अतिशय चांगली डिश आहे ही...
मी सहज करून,,
बघितलं मला जास्त त्या दिवशी भूक नव्हती रात्रीची...
विचार केला आमलेट करावं,
मग डोक्यातच आलं की औषध घ्यायचे आहे तर थोडं हेवी खावे लागेल,,
मग घरी मोड आलेले मूग होते,
मग डोक्यात आयडिया सुरू झाल्या..
मग अजून विचार आला की हे खूप सिम्पल होईल आणि तेवढी खायला मजा येणार नाही...
चीज होते, वा वा आता मजा येईल...
असे करत करत खूप सुंदर माझी डिश तयार झाली,,
अतिशय सुंदर झालेला आहे हे मूग लेट,,
मस्त विटामिन्स पोटात गेले,
सहज इनोव्हेट झालेली डिश,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
1 सर्विंग
  1. 2अंडे
  2. 1/2 कपमोड आलेले मूग
  3. 2लसून पाकळ्या
  4. 1हिरवी मिरची
  5. 1/2 टीस्पूनजिरे
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 पिंचहिंग
  10. 2 टीस्पूनतेल
  11. 3 टेबल स्पूनचीझ
  12. 1 टेबल स्पूनकोथिंबीर
  13. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    सर्वप्रथम गॅसवर कडे ठेवणे, त्यामध्ये एक टीस्पून तेल घालून त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, हिरवी मिरची बारीक चिरलेली, लसुण बारीक चिरलेला घालून परतून घ्यावे, एक मिनिट हे परतून घ्यावे आता यामध्ये मोड आलेले मूग घालावे, आणि मीठ चवीप्रमाणे घालावे, ते फक्त दोन मिनिटं सोते करून घ्यावे, मूग आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहे फक्त परतून घ्यायचे आहे, ते क्रंची असायला हवे,. गॅस बंद करावा.

  2. 2

    तवा गॅसवर गरम करायला ठेवा,एका बाऊल मध्ये दोन अंडी फोडून घ्यावेत, त्यामध्ये कोथिंबीर घालावी आणि चुटकी भर मीठ घालावे, मीठ हे फार कमी घालावे, कारण आपण जे चीझ घालणार आहोत त्या चीज मध्ये भरपूर मीठ असतं, आता अंड फेटुन घ्यावे, त्या मधे कोथिंबीर घालून घ्या, तव्यावर एक टीस्पून तेल घालावे, आणि ते ऑम्लेट पसरवून घ्यावे,, आपण केलेली मूगउसळ आमलेट वर घालून द्यावी,

  3. 3

    उसळ एक सारखी ऑम्लेट वर पसरून द्यावी,, गॅस हा सुरुवातीपासून मंद आचेवरच ठेवायचा, नाहीतर आपलं ऑम्लेट करपून जाईल, आता ऑम्लेट, उसळ वर चीझ पसरून द्या,

  4. 4

    आता त्यावर दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून द्या, लक्षात ठेवा गॅस हा मंद असावा पहिले पासून, आता छान आपले चीझ मुगलेट तयार आहे, छान त्याला गरम गरमच खावे,, छान क्रंची होते हे मुगलेट, खायला खूप यम्मी आणि मजेशीर आहे, करून बघा तुम्ही पण हा पदार्थ, तेल कमीत कमी आणि पोष्टिक खूप आहे हा, खूप हेल्दी पदार्थ,,,👍🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes