बटाटा वडा

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#स्ट्रीट
आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा वडापाव म्हणजे फेमस पदार्थ. आता तर गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसतात, गरीब ते श्रीमंत वर्ग हा वडापावचा शोकीन आहे.
सध्या लॉकडाउन असल्यामुळे पण मिळत नाहीत म्हणून नुसते बटाटे वडे खा.

बटाटा वडा

#स्ट्रीट
आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा वडापाव म्हणजे फेमस पदार्थ. आता तर गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसतात, गरीब ते श्रीमंत वर्ग हा वडापावचा शोकीन आहे.
सध्या लॉकडाउन असल्यामुळे पण मिळत नाहीत म्हणून नुसते बटाटे वडे खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
५-६ जण
  1. 3मध्यम आकाराचे बटाटे
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. 5-6लसूण पाकळ्या
  4. 1 टिस्पून लिंबूरस
  5. 1/2 टिस्पून हळद
  6. चवीनुसारमीठ
  7. 1/2 टिस्पून जिरे
  8. 1/2 टिस्पून मोहरी
  9. 1/2 टिस्पून हिंग
  10. 6-7कढिपत्त्याची पाने
  11. फोडणीकरता तळण्यासाठी तेल
  12. 2 कपबेसन
  13. 2 टिस्पून गरम तेलाचे मोहन
  14. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून सोलून घ्या. हिरवी मिरची व लसूण पाकळ्या यांचा दगडाने खर्डा करून घ्या, बटाट्यात हळद, मीठ, लिंबूरस घाला.

  2. 2

    फोडणीत तेलात जिरे मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची व लसूण यांचा खर्डा घाला. परतून गॅस बंद करा. कोथिंबीर घालून सर्व मिक्स करा. त्याचे हव्या त्या आकारात गोळे बनवा व फ्रीझमध्ये तेल तापेपर्यंत ठेवा.

  3. 3

    दुसरीकडे तेल तापवत ठेवा. भांड्यात बेसन, मीठ, गरम तेल घालून चांगलं फेटा म्हणजे पीठ हलकं होईल. आता बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात घोळवून तेलात वडे टाका. तळून घ्या.

  4. 4

    गरमागरम बटाटे वडे तळलेल्या हिरव्या मिरची सोबत आणि लाल लसूण चटणी सहित सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes