आमखंडी(वाडवळ स्पेशल)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

एकदम साधी सोप्पी, तोंडाला पाणी आणणारी तेवढीच मोजक्याच जिन्नसात तयार होणारी रेसिपी.
पिढी दर पिढी बनविली जाणारी ही पारंपारिक रेसिपी आहे. अगदीच मोजक्या जिन्नसांचा वापर होतो.कैऱ्यांच्या मोसमात करंदीसोबत युती घडवून तयार होणारी हि अस्सल वाडवळी रेसिपी. लंगडी म्हणून एक भांड्याचा प्रकार असतो ते भांड तुम्ही ह्या भाजीसाठी असेल तर वापरू शकता.आंबट गोडसर चटकदार कैरीचा सिझन सुरू होतो आणि फिशमार्केटला करंदी मिळायला सुरुवात होते.फिकट गुलाबी रंगाची ही करंदी जरी आकाराने छोटी असली तरी चवीला खूप छान असते. भाजी शिजल्यावर जो वास पसरतो ना त्यानेच तोंडाला पाणी सुटते. ज्यांना कैरी खाल्यावर त्रास होतो त्यांनी वाफेवर ठेवलेल्या पाण्यात कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात आणि मग भाजीत मिसळून घ्याव्यात.(त्याने कैऱ्यांचा आम निघून जातो. )कैरी शिजलेले वाफेवरचे पाणी भाजीत टाकू नये.ही भाजी दुपारी बनवून थंड झाल्यावर संध्याकाळी खाण्यात खरी मज्जा असते😋ही भाजी गरमागरम भात,तांदळाच्या भाकरी अथवा घावण्यासोबत छान लागते.ह्या भाजीचा अजून एक प्रकार राळुन करणे.ही पद्धत तुम्हाला माहीत आहे की नाही त्याची मला कल्पना नाही. पण राळलेल्या भाज्या खूप चविष्ट लागतात.वाडवळी मसाला प्रत्येकाकडे असेलच असे नाही तुम्ही तुमच्या घरातील रोजचा घरगुती मसाला भाजीत घालू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 ते 5 servings
  1. 5ते 6 कांदे उभे चिरलेले
  2. 3ते 4 कैऱ्या उभ्या चिरलेल्या
  3. 2वाटे साफ केलेली ओली करंदी
  4. 1टेबलस्पून आले लसूण पेस्ट
  5. 2टेबलस्पून घरगुती वाडवळी मसाला
  6. 2टीस्पून हळद
  7. चवीनुसार मीठ
  8. कोथिंबीर
  9. पाणी गरजेनुसार
  10. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    करंदी साफ करून तीन ते चार वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी.

  2. 2

    कांदे व कैऱ्या स्वच्छ धुवून सोलून चिरून घ्या.

  3. 3

    एका जाड बुडाच्या भांड्यामधे तेल गरम झाल्यावर कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. (इथे कांदा सोनेरी वैगरे करू नये) आता त्यात आले लसणाचे वाटण घालून एक मिनिटभर परतुन घ्यावे. त्यात वाडवळी मसाला,हळद,मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे.

  4. 4

    साफ केलेली ओली करंदी, कैरीचे काप घालून मसाल्यात एकजीव करून परतवून घ्या. थोडे पाणी घालून भाजी व्यवस्थित मिसळून घेतली की झाकणावर पाणी ठेऊन वाफेवर शिजू द्या.गरज भासल्यास आणखी थोडे पाणी घालावे.

  5. 5

    15 ते 20 मिनिटे भाजी मंद आचेवर शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यावर वरून कोथिंबीर भुरभुरावी आणि चांगली ढवळून गॅस बंद करावा.

  6. 6

    ही भाजी गरमागरम भात,तांदळाच्या भाकरी अथवा घावण्यासोबत छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

Similar Recipes