टेस्टी नाचो

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

घरात सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवायला आणखी एका पदार्थाची भर....😄 मस्त क्रिस्पी सुपर टेस्टी आणि मधल्या वेळेत मुलांना खायला बनवण्यासाठी उपयुक्त स्नॅक्स... नक्की ट्राय करा.

टेस्टी नाचो

घरात सर्वांच्या जिभेचे चोचले पुरवायला आणखी एका पदार्थाची भर....😄 मस्त क्रिस्पी सुपर टेस्टी आणि मधल्या वेळेत मुलांना खायला बनवण्यासाठी उपयुक्त स्नॅक्स... नक्की ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीतांदळाचे पीठ
  2. 1 वाटीपाणी (सेम वाटी घ्या पिठाची)
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. चवीनुसारमीठ
  5. 1/4 टीस्पूनजिरे
  6. 200 ग्रामतेल
  7. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  8. 1/4 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात पाणी उकळून घ्या, त्यात मीठ व हळद घाला. मग तांदळाचे पीठ घालून चांगले ढवळून घ्या. झाकण ठेवून वाफ येऊ द्या. आणि गॅस बंद करून १० मिनिटे झाकून ठेवा. मग जिरे घालून हे पीठ चांगले मळून घ्या. (मी भाकरी साठी केलेली उकड घेतली आहे, हळद, जिरे नंतर घातली त्यात)

  2. 2

    ह्या पिठाची प्लास्टिक शीट वर पातळ पोळी लाटून घ्या. आणि तिचे आवडत्या आकारात तुकडे पाडा. मग काट्याच्या साहाय्याने सगळीकडे टोचून घ्या म्हणजे तळताना फुगणार नाही. (फुगले तर नरम होतील)

  3. 3

    ह्या चिप्स गरम तेलात तळून घ्या. वरून लाल तिखट, चाट मसाला घालून सर्व्ह करा. ह्या बरेच दिवस टिकतात बंद डब्यात ठेवल्या तर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes