चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आज अशीच एक वेगळी रेसिपी केली आहे...... चिकन लपेटा

चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)

आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आज अशीच एक वेगळी रेसिपी केली आहे...... चिकन लपेटा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 जणांसाठी
  1. 500 ग्रॅमचिकन
  2. 2 टेबलस्पूनदही
  3. 1 कपटोमॅटो प्युरी
  4. 1-1/2 कपकांदा
  5. 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 2 टीस्पूनलाल मसाला
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनधने जिरे पावडर
  10. 2 टीस्पूनकसुरी मेथी
  11. 1/2 कपभाजलेले सुके खोबरे
  12. 10-12काजू
  13. 1 कपकोथिंबीर
  14. 2हिरव्या मिरच्या
  15. 1अंडे
  16. 1/2 कपतेल
  17. 2वेलची
  18. 1 इंचदालचिनी
  19. 1 कपपाणी
  20. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चिकन स्वछ धुवून त्याला मीठ, दही, आले लसूण पेस्ट, 1टीस्पून धने जिरे पावडर, हळद 1 टीस्पून लाल मसाला, 1टीस्पून कसुरी मेथी टाकून मिक्स करून 1/2 तास मॅरीनेट करत ठेवा. आता खोबरे, काजू, मिरची-कोथिंबीर ची पेस्ट करून घ्या. आता मॅरीनेट केलेले चिकन फ्राय पॅन मध्ये थोडे तेल टाकून फ्राय करा.(दोन्ही बाजु प्रत्येकी 6-7 मिनिटे फ्राय करा.)

  2. 2

    आता दुसऱ्या भांड्यात 2 टेबलस्पून तेल टाका तेल चांगले तापले की त्यात वेलची व दालचिनी तुकडा टाका.त्याचा सुगंध सुटला की त्यात कांदा टाकून गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. मग त्यात मसाले टाकून चांगले परतवा. आता त्यात टोमॅटो प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.

  3. 3

    आता तयार पेस्ट टाकून 2 मिनिटे परतवा. त्यामध्ये1 कप पाणी टाकून घ्या चवीनुसार मीठ टाका आपण चिकन ला पण मीठ लावले होते त्यामुळे मीठ जरा जपूनच टाकावे

  4. 4

    आता तयार ग्रेव्हीत फ्राय चिकन टाकून मिक्स करा.5 मिनिटे उकळी येऊ द्या. आता वरून कसुरी मेथी टाकून मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनट ठेऊन गॅस बंद करा. आता ऑम्लेट साठी एका बाऊल मध्ये मीठ टाकून त्यात अंडे फोडून टाका व चांगले फेटा. तव्यावर तेल टाकून तेल तापलं की त्यात फेटलेलं अंड टाका व पातळ ऑम्लेट कडून घ्या.

  5. 5

    आता ऑम्लेट चे फोटोत दाखवल्या प्रमाणे तुकडे करा व त्याचा रोल करून घ्या. तयार चिकन सर्व्हिंग बाऊल मध्ये घ्या व त्यावर ऑम्लेटचे रोल ठेवा. चपाती, रोटी किंवा भाकरी सोबत आस्वाद घ्या.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes