मिनी इडली मंचुरियन

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

मुलांसाठी काहीतरी चटपटीत व पौष्टिक हवं ना म्हणून प्रयत्न ही रेसिपी. व गोल्डन अप्रीन चां ९ व विक चालू झाला व त्यात शब्द आला स्टीम मग काय केली झटपट होणारी रेसिपी.
#किड्स
#goldenapron3
#steam

मिनी इडली मंचुरियन

मुलांसाठी काहीतरी चटपटीत व पौष्टिक हवं ना म्हणून प्रयत्न ही रेसिपी. व गोल्डन अप्रीन चां ९ व विक चालू झाला व त्यात शब्द आला स्टीम मग काय केली झटपट होणारी रेसिपी.
#किड्स
#goldenapron3
#steam

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-६ व्यक्ती
  1. २ कप तांदूळ
  2. १ कप उडीद डाळ
  3. मोठ्या पतीचा कांदा
  4. १ कप कोबी बारीक चिरून
  5. १ कप सिमला मिरची बारीक चिरून
  6. गाजर लांब कापून
  7. हिरव्या मिरच्या
  8. इंच आलं
  9. २- ३ लसूण पाकळ्या
  10. २ मोठे चमचे सोय सॉस
  11. २ मोठे चमचे टोमॅटो सॉस
  12. मीठ चवीनुसार
  13. ३ चमचे तेल
  14. ३ चमचे कॉर्न फ्लोअर
  15. १/२ कप पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम २-१ प्रमाण घेऊन दल तांदूळ भिजत घालावे ४-५ तास व नंतर वाटून घ्यावे आणि एकत्र करून ७-८ तासासाठी अंबावयला ठेवावे. नंतर हे पीठ इडली पत्रा मधे घालून त्याच्या छोट्या साइज मधे इडली करून घ्यावं

  2. 2

    आता सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्या.

  3. 3

    आता एका पॉट मधे ३ चमचे तेल घ्यावं व त्यात आल,लसूण व हिरवी मिरची टाकून छान परतून घ्यावं. नंतर त्यात अनुक्रमे गाजर, सिमला मिरची टाकून परतून घ्यावं.

  4. 4

    हे २ थोडीफार शिजल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालावं व पातीचा कांदा घालावा. नंतर त्यात सोया सॉस व टोमॅटो सॉस घालावा व छान एकत्र करून घ्यावा. सॉस घातल्यावर जास्त शिजू नाही द्यायच्या भाज्या फक्त १दा एकत्र करायच्या. नंतर त्यात ३ चमचे कॉ्नफ्लोअर व पाणी अस मिश्रण करून ते घालावं ज्यान छान दाटपणा येईल.

  5. 5

    सगळ्यात शेवटी त्यात मिनी इडली घालून v चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करावं. आता वरून पातीचा कांदा व गाजर घालून सर्व्ह करावं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes