मसूरची उसळ

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#goldenapron3 week 15 sprouts
कडधान्यांमधे मसूर हे कडधान्य खूप जणांचे आवडते आहे. आमच्या कडे पण मसूरची उसळ किंवा रस्सा भाजी खूप आवडते. मी इथे मसूरच्या उसळीची रेसिपी देत आहे.

मसूरची उसळ

#goldenapron3 week 15 sprouts
कडधान्यांमधे मसूर हे कडधान्य खूप जणांचे आवडते आहे. आमच्या कडे पण मसूरची उसळ किंवा रस्सा भाजी खूप आवडते. मी इथे मसूरच्या उसळीची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १५० ग्रॅम मसूर
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 8कडिपत्ता पाने
  5. 4कोकम
  6. 2 टीस्पूनमालवणी मसाला
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनतांदूळ पीठ
  10. 2 टीस्पूनगुळ
  11. 2 टीस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदे आणि टोमॅटो बारीक चिरुन घेतला. लसूण सोलून ठेचून घेतला. कडिपत्ता पाने धुवून घेतली. मग कुकर मधे तेल घालून त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात कडिपत्ता घालून, बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतला. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतला आणि त्यात ठेचलेला लसूण घालून परतले.

  2. 2

    परतलेल्या खांद्यावर मालवणी मसाला, हळद, मीठ आणि कोकम घालून, चविसाठी गुळ घातला. आवडतं नसल्यास घालू नये. मग त्यात एक टीस्पून तांदूळाचे पीठ पाण्यात कालवून घालावे, यामुळे उसळीला दाटपणा येतो. भिजवलेले मसूर घालून परतून त्यात पाणी घातले.

  3. 3

    दोन शिट्या काढून मसूर शिजवून घेतले. आणि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स केले.

  4. 4

    गरमागरम मसूरची उसळ कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes