स्टफ्ड इडल्या, चटणी आणि सांबार(stuffed idli chutney aani sambhar recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#स्टफ्ड इडली सांबार हा आमच्या घरातील एक आवडता पदार्थ आहे. नेहमी मी साध्याच इडल्या बनवते. पण आज कुकपॅडमुळे मला स्टफ्ड इडल्या बनवायला मिळाला. खूप छान टेस्ट लागली. त्याची कृती देत आहे.

स्टफ्ड इडल्या, चटणी आणि सांबार(stuffed idli chutney aani sambhar recipe in marathi)

#स्टफ्ड इडली सांबार हा आमच्या घरातील एक आवडता पदार्थ आहे. नेहमी मी साध्याच इडल्या बनवते. पण आज कुकपॅडमुळे मला स्टफ्ड इडल्या बनवायला मिळाला. खूप छान टेस्ट लागली. त्याची कृती देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एकूण वेळ अर्धा तास
४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम उडीद डाळ
  2. २०० ग्रॅम इडलीचा रवा
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 10कडिपत्ता पाने
  7. २०० ग्रॅम ओले खोबरे
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. 1/2लिंबू
  10. 2 टीस्पूनमीठ
  11. 2 टेबलस्पूनसांबार मसाला
  12. 1 टीस्पूनतिखट पूड
  13. 1 टीस्पूनधणे पूड
  14. 2 टीस्पूनमोहरी
  15. 1 टीस्पूनजिरे
  16. 2 टेबलस्पूनतेल
  17. 2 टीस्पूनचिंच
  18. 1 टीस्पूनगुळ

कुकिंग सूचना

एकूण वेळ अर्धा तास
  1. 1

    उडीद डाळ आणि इडली रवा वेगवेगळ्या भांड्यात पाण्यात रात्रभर भिजत ठेवला.

  2. 2

    सकाळी उडदाची डाळ वाटून त्यात भिजवलेला इडली रवा घालून मिक्स करुन बॅटर फुगण्यासाडी आठ तास उबदार जागी ठेवले. आणि नंतर इडली बॅटर छान फुगून आले.

  3. 3

    इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यात इडली बॅटर घालून त्यामधे घरात शिल्लक असलेली डाल फ्राय घालून त्यावर सांबार मसाला आणि मीठ शिंपडून परत त्यावर इडली बॅटर घालून कुकरमधे शिटी न लावता इडल्या पंधरा मिनिटे उकडायला ठेवल्या.

  4. 4

    कुकरमधे पंधरा मिनिटे उकडून झाल्यावर स्टफ्ड इडल्या तयार झाल्या.

  5. 5

    ओले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर, मीठ आणि लिंबू पिळून हे सर्व मिक्सर मधून बारीक वाटून चटणी करुन घेतली.

  6. 6

    सांबार करण्यासाठी शिजवलेली डाळ घोटून घेतली. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन घेतले. मग कढई मधे तेलात मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घालून फोडणी करुन त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतला मग बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून त्यात तिखट पूड, हळद, धणे पूड, सांबार मसाला आणि मीठ घालून त्यात चिंच आणि गूळ घालून चांगले परतून मिक्स करुन त्यात शिजवलेली डाळ घोटून घातली आणि चांगली उकळी आल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली.

  7. 7

    एका प्लेटमधे स्टफ केलेल्या इडल्या मधे कट करुन ठेवल्या, एक स्टफ इडली ठेवून बरोबर एका लहान बाऊल मधे चटणी आणि एका बाऊल मधे सांबार घालून कोथिंबीर घालून गरमागरम स्टफ्ड इडल्या चटणी आणि सांबार बरोबर सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes