डाळ मँगो मस्तानी

#डाळ ..चना डाळीच पूरण बनवले ..आणी आंब्याचा असे दोन्ही आटवून... एक ईनोव्हेटिव डीश तयार केली ...म्हणजे डाळीचे पूरण +आंबा रस =डाळ मँगो मस्तानी .. ...नामकरण आम्हीच केले ..नाव नविन असल की पदार्थ पण नवीन आहे अस वाटत ....😊
डाळ मँगो मस्तानी
#डाळ ..चना डाळीच पूरण बनवले ..आणी आंब्याचा असे दोन्ही आटवून... एक ईनोव्हेटिव डीश तयार केली ...म्हणजे डाळीचे पूरण +आंबा रस =डाळ मँगो मस्तानी .. ...नामकरण आम्हीच केले ..नाव नविन असल की पदार्थ पण नवीन आहे अस वाटत ....😊
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चनाडाळ 1 टेबलस्पून तांदूळ धूवून...पाणी टाकून कूकर मधे शीजवून घेऊ...नंतर एका कढईत शीजलेली डाळ,साखर,गूळ एकत्र करून घेऊ...
- 2
नंतर गँसवर कढई ठेवून आटवून घेऊ.आटले की जायफळ पूड टाकून पूरण यंत्रातून बारीक करून घेऊ....आता एक आंबा घेणे..
- 3
त्याचा रस काढून घेणे मोजून 1कप 200ml चा आणी एका पँनमधे टाकणे आणी सोबतच 50 ग्राम साखर टाकणे आणी आटवणे..
- 4
ते थोडे आटले की त्यात 2 1/2कप बारीक केलेल पूरण टाकून आटवून घेणे गोळा होईपर्यंत..
- 5
नंतर काढून थंड करून 10मींट फ्रीज मधे ठेवू म्हणजे छान गोळा होईल...आता मैद्यात,कणीक,तूपािच मोहन मीठ टाकून पाण्याने साधारण घट्ट पिठ भीजवून घेऊ...आणी 10मींट झाकून ठेवू....
- 6
आता पिठाचा एक गोळा घेऊन त्यात मँगो पूरण भरून पोळी लाटून घेऊ...
- 7
गँसवर तवा गरम करून त्यावर पोळी टाकून खालून वरून साजूक तूप लावून लो ते मीडीयम आचेवर खरपूस भाजून घेणे....
- 8
आपली (डाळ मँगो मस्तानी)पूरण पोळी तयार खाण्यासाठी...खातांना वरून तूप टाकणे कींवा दूधासोबत आवडेल तशी खाणे...
Keywords
Similar Recipes
More Recipes


























टिप्पण्या (6)