सांबार वडा (sambar wada recipe in marathi)

#सांबार वडा..
ह्या लॉकडावून मधे , पदार्थ बनवायची खायची ,खावू घालायची इतकी सवय झाली आहे की एकही दिवस काहीही बनवल्या शिवाय राहवत नाही , आज असेच काय बनवू काय बनवू विचार करत होती , तर मुलगा म्हणाला मम्मी सांबार वडा बनव तर मग काय पटकन डाळ भिजू घातली आणि शेवटी आज चां मेनू ठरला आणि बनवला पण ....
सांबार वडा (sambar wada recipe in marathi)
#सांबार वडा..
ह्या लॉकडावून मधे , पदार्थ बनवायची खायची ,खावू घालायची इतकी सवय झाली आहे की एकही दिवस काहीही बनवल्या शिवाय राहवत नाही , आज असेच काय बनवू काय बनवू विचार करत होती , तर मुलगा म्हणाला मम्मी सांबार वडा बनव तर मग काय पटकन डाळ भिजू घातली आणि शेवटी आज चां मेनू ठरला आणि बनवला पण ....
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम डाळी धुवून भिजत घाला 5 तास
- 2
आता सर्व भाज्या आणि तुर डाळ आणि चना डाळ वेगळ्या वेगळ्या भांड्यात ठेवून कुकर मध्ये शिजवून घ्या
- 3
आता डाळ व भाज्या शिजल्या आहेत, एका भांड्यात 3टेबलस्पून तेल टाका गरम होवू द्या आता जिर मोहरी हिंग लाल मिरच्या टाकून फोडणी द्या व वरण व भाज्या टाका, आता त्यात धने पुड, जिर पुड, चिंचे चे पाणी सांबर मसाला थोड गुळ टाकून उकळू द्या
- 4
आता आपण डाळ मिक्सर मध्ये बारीक करून घेवू, व यात कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता, हिरवी मिरची, हिंग व मीठ बारीक करून टाकू, आता ह्यात थोडा सोडा टाकून मिश्रण हलके होत पर्यंत फेटा 5 न मिनिट व झाकून अर्धा तास ठेवा
- 5
आता एका कढई त तेल गरम करून, प्लेट वर पाणी लावून फोटो मधे दाखवल्या प्रमाणे वडे करा व तेलात सोडा, व गोल्डन रंगाचे होत पर्यंत तळा, आपले वडे छान तळून झाले आहेत
- 6
आपला सांबार तयार आहे
- 7
या मग बसा खायला
Top Search in
Similar Recipes
-
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#week6#विंटर स्पेशल रेसिपी#वडा सांबारसगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6 ... आज सकाळचा नाश्ता, मस्त गरमागरम वडा सांबार. Varsha Ingole Bele -
व्हेजिटेबल सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)
#सांबार... इडली,दोसा , सांबार वडा सोबत अतिशय चवीने खाल्ला जाणारा सांबार आज मी बनवला आहे यात आपल्याला आवडतील त्या भाज्या मिक्स करून आपण हा सांबर बनवू शकतो तसाच मी आज बनवला आहे.... Varsha Deshpande -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB5#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#Week6#वडा सांबारवडा सांबार नेहमीच आपण बनवतो. पण मी जरा थोडासा वेगळा. माझ्या नवऱ्याची ही आवडती डिश आहे. उद्दीन वडा पण याला म्हणतात. Deepali dake Kulkarni -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6 #रेसिपी इ बुक चॅलेंज वडा सांबार नाव निघताच तोंडाला पाणी सुटत होय ना पुर्वी फक्त उडपी हॉटेल मध्येच हे पदार्थ मिळत असे पण आता घरोघरी पोटभरीचा नाष्टा म्हणुन वडा सांबार केला जातो चला तर हा नाष्टा कसा करायचा ते बघुया Chhaya Paradhi -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#SDR #समर डिनर रेसिपी उन्हाळात सध्या जेवण जात नाही अशा वेळी वेगळी चटपटीत सगळ्याच्या आवडीचा इडली सांबार चटणी हा मेनु केला तर सगळेच पोटभर खाऊ शकतात चला तर इडली सांबार चटणीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#RJR #रात्रीचे जेवण रेसिपिस # रोजरोज पोळी भाजी वरण भाताचा कंटाळा येतो ना ? आमच्याकडे ही हिच परिस्थिती मग चला रात्रीसाठी हटके बेत करूया मी आज बनवल आहे इडली, सांबार, चटणी चला तर लगेच रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
सांबार (sambar recipe in marathi)
#लंच#सांबार#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज सांबार हा पदार्थाची रेसिपी शेअर करते.सांबार हा दक्षिण भारतातला प्रमुख असा पदार्थ आहे इडली ,डोसा ,भात बरोबर सर्व केला जातो. हा एक असा पदार्थ आहे सकाळी एकदा बनवला म्हणजे पूर्ण दिवस हा पदार्थ खाऊ शकतो. दक्षिण भारताचे जेवण सांबार शिवाय पूर्ण होत नाही. दक्षिण भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे सांबार बनवले जातात. सांबार ची एक विशेषता आहे यात कोणतेही भाज्या आपण टाकून सांबार एन्जॉय करू शकतो. बर्याच प्रकारच्या भाज्या टाकून सांबार बनवले जाते. जेव्हा मी सांबार बनवते तेव्हा त्यात शक्य तेवढ्या भाज्या टाकते आमच्या कुटुंबात भाज्या जास्त खाल्ल्या जातात आवडतातही, सांबाराच्या माध्यमातून बरेच भाज्या आहारात आपल्याला मिळतात. कुटुंबात सर्वांच्या आवडीच्या भाज्या मी सांबार मध्ये ऍड करते मला वांगी आवडतात मी वांगी टाकते, घरात बाकीच्यांना भेंडी कोणाला बटाटा कोणाला शेवगाच्या शेंगा, अश्या बऱ्याच आपण ऍड करू शकतो. बऱ्याच भाज्या असल्यामुळे सांबार हा पदार्थ सर्वात जास्त आवडीचा आहे. सकाळी इडली, डोसा चा बेत झाला तर संध्याकाळी भाताबरोबर सांबार खाऊ शकतो तसा हा पदार्थ डाळ, भाज्या असल्यामुळे पौष्टिक होतो. Chetana Bhojak -
मेदू वडा(meduwada recipe in marathi)
आज सकाळी नाश्त्याला मेदू वडा बनवला. खूप टेस्टी झालेला... सोबतीला सांबार व चटणी होतीच..... त्याशिवाय कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाला चव नाही... Sanskruti Gaonkar -
डाळ मिक्स तडका
#डाळआज काय भाजी बनवायची प्रश्न सर्वांना च ना...मग आज मी मिश्र डाळीचे मस्त तडकेबाझ वरण बनवले Maya Bawane Damai -
वडा सांबार /मेदूवडा (vada sambar recipe in marathi)
नेहमी नेहमीं नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतो .पोहे ,उपमा, खावून खावून कंटाळा येतो. त्यामुळे वडा सांबार करायचे ठरवले. दक्षिणेमध्ये लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. हेल्दी आणि पचायला हलका असा नाश्ता आहे. rucha dachewar -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#वडा_सांबार माणसांसारखीच पदार्थांची देखील एकमेकांशी घट्ट मैत्री असते...त्यांच्या देखील अतूट जोड्या आहेत..अगदी रब ने बना दी जोडी..🤩असंच पदार्थांच्या बाबतीत देखील आपल्याला म्हणता येईल..जसं की वडा पाव,पावभाजी,मिसळ पाव, छोले भटुरे,भेळ पुरी,पाणी पुरी,रगडा पँटीस, पुरी भाजी,श्रीखंड पुरी,इडली चटणी,वडा सांबार...या काही अजरामर घट्ट जोडगोळ्या..इतक्या की एकमेकांशिवाय आध्या अधुर्या..एकमेकांवरील अपार प्रेमामुळे एकमेकांची जणू पहचान बनलेल्या आहेत या हीर रांझा,लैला मजनू,जय विरु वाल्या जोड्या..😍..माझ्या फँटसीचा भाग सोडला तर खरंच या जोड्या एकमेकांमध्ये इतक्या समरसून गेल्या आहेत की खाणार्याच्या रसना तृप्त झाल्याच म्हणून समजा..😊 पदार्थांच्या या जोड्या ज्यांनी कोणी तयार करुन आपली खादाडी अधिक चविष्ट केल्याबद्दल त्या सर्व सुगरणींना,बल्लवाचार्यांना माझा मनापासून नमस्कार..🙏🙏 चला तर मग आज आपण वडा सांबार या खमंग जोडगोळीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
झणझणीत कट वडा सांबार (kaat wada sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week2गावाकडची आठवण 2सासवड माझं माहेर,आमच्या कडील भाज्या उत्तम चवीच्या. तेव्हा खूप काही हॉटेल्स नव्हते,पण अस्मिता चा वडा पाव, त्यांची भेळ हे पदार्थ खूप famous.पण त्याहून ही आठवण म्हणले कि कॉलेज च्या मैत्रिणी सोबत घालवलेले क्षण, कॉलेज जवळ प्रसन्न मध्ये हा मेनू आमच्या आवडीचा, मग ग्रुप मध्ये कोणाचा बर्थडे असला कि खास या मेनू साठी तिने याचीच पार्टी द्यायची बर का! मस्त गरम गरम वडे, त्या सोबत हा झणझणीत सांबार, न एक पितळेच्या भांड्यात भरून दिलेला कट, न आमचे हसणे खिदळणे, खरंच या थिम मुळे आठवणी जाग्या झाल्या. Varsha Pandit -
वडा सांबार (तुरीच्या डाळीची सांबार)(Medu vada sambar recipe in marathi)
#GA4#week13की वर्ड वरुन तुरीची डाळ असे होते . मी सांबार पोस्ट करत आहे, व मेदू वडा पटपट कसे करायचे,हे पण सांगीतले आहे. मेदु वडाचे मशीन ची गरज नाही. Sonali Shah -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6 वडा सांबार हा उडपी मध्ये जास्त पहिला जातो..उडपी हॉटेल्स मधली famous डिश.. सांबारासोबत हे गरमागरम वडे खाणे म्हणजे सुख😊😊साऊथ इंडियन डिशेस तसे माझे favourite आहेत.. चटपटीत सांबारासोबताची वड्याची रेसिपी आपण पाहुयात.. Megha Jamadade -
सांबार वडी (sambar wadi recipe in marathi)
सांबार,कोथिंबीर दोन्ही एकच. काही भागात या दोन नावाने ओळखली जाते. इच्या शिवाय एकही तिखट पदार्थ छान होत नाही. आणिडीश ची सजावट करण्यात तर ही पटाईत.सांबार वडी म्हणजे माझ्या माहेर ची आठवण.अमरावती फेमस डिश... सांबार वडी Anjita Mahajan -
सांबार (sabhar recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी प्रिती ताईची आहे सांबार खुप छान झाला आवडला सगळयांना Tina Vartak -
उडीद वडा/ सांबार वडा (udid sambar vada recipe in marathi)
#स्नॅक्स#सांबरवडासांबर वडा हा दक्षिण भारतातला.. तरीही सर्व भारतात याची प्रसिद्धी आहे.. खूप जास्त लोक आवडीने सांबार वडा खातात..तुम्ही कुठेही जा. तुम्हाला सांबर वडा हा मिळेलच. स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ, पदार्थाला लागणारे साहित्य ही कमी...सांबर वडा नुसत्या उडीद डाळीपासून किंवा उडीद - मुग मिळून, किंवा उडीद - चनादाळ मिळून केला जातो.... 💃 💕 Vasudha Gudhe -
दाक्षिणात्य सांभार/सांबार (sambar recipe in marathi)
#drसांभार हा शब्द कसा प्रचलित झाला माहिती आहे?...दक्षिणेकडील तंजावरचे राजे छत्रपती शाहुजी -१यांनी छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या खानपानाप्रित्यर्थ केलेली तूरडाळ आणि चिंचेचा कोळ घालून आमटी केली. कारण त्यांच्या मुदपाकखान्यातील आचारी नेमके सुट्टीवर गेले होते.संभाजी महाराजांच्यासाठी खास केलेली आमटी म्हणजे संभाहार!मग तंजावर छत्रपती शाहुजी यांच्या दरबाराने त्याचे नामकरण "सांभार"असे केले!!दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र,केरळ आणि तमिळनाडू या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने सांबार केले जाते.यात प्रामुख्याने तूरडाळ,चिंचेचा कोळ,शेवग्याच्या शेंगा आणि भरपूर भाज्यांचा समावेश असतो.नुसत्या सांबाराचेच दक्षिणेकडे जवळपास ५०प्रकार आढळतात.इडली,वडा,डोसा,अप्पम याबरोबर अशा प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी मुबलक अशा सांबाराचे महत्त्वाचे स्थान आहे.या सगळ्या delicasies चा सांबाराशिवाय विचारही करता येत नाही.कर्नाटक सांबारात कांदा लसूण यांचा समावेश असेलच असं नाही.तर तमिळ सांबारात स्थानिक भाज्यांचा जास्त समावेश असतो.उडुपी-शेट्टी सांबार मंगलोर स्टाईलचे थोडं उग्र,पण सुवासिक असते.कर्नाटक ब्राह्मण याला "हुली"म्हणतात तर कोस्टल आणि तमिळमधे सांबार!सांबार जेवढे मुरत जाईल तितके छान लागते.ते केल्याबरोबर पहिल्या दिवशी इडली,डोशाबरोबर छान लागते तर दुसऱ्या दिवशी भाताबरोबर! तेलंगाणा, केरळ इथे नारळ मुबलक म्हणून नारळाचा चव आणि मसाले घालतात.इतरत्र चिंचेचा कोळ मात्र आवश्यक असतो...थोड्या आंबट,तिखट चवीचे सांबार जगभर प्रसिद्ध आहे.करण्याच्या अनेक पद्धती असल्या तरी कांदा,टोमॅटो,वांगी,भेंडी,दुधी भोपळा, लाल भोपळा,शेवगा,फ्लॉवर,गाजर या भाज्यांनी सांबाराला परिपूर्णता येते. Sushama Y. Kulkarni -
वडा सांबार चटणी (vada shambar chutney reciep in marathi)
वडा सांबार चटणी हा साउथ चा ब्रेक फास्टचा प्रकार आहे. व सगळ्यांचा आवडीचा प्रकार आहे. Shobha Deshmukh -
वडा साबंर (wada sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतपावसाळी वातावरण म्हणजे पर्वणीच गरमागरम पदार्थ खायला मजा येते आणि पदार्थ चमचमीत असेल तर आणखीनच आनंद. Supriya Devkar -
वडा सांबार (vada sambhar recipe in marathi)
हा दाक्षिणात्य नाष्टयाचा प्रकार आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा आहे.#EB6 #W6 Sushama Potdar -
बटाटा वडा सांबार(Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#W14महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा बटाटेवडा !खावा तर पावाबरोबरच.किंवा एखाद्या ओल्या चटणीबरोबर किंवा आपल्या कर्जत बटाटे वड्याला जी चटणी,मिरची मिळते त्याबरोबर.पण आपल्या देशात खाद्यसंस्कृतीची विविधता इतकी आहे की थोडे तुमचे...थोडे आमचे करत महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची मस्त दिलजमाईच झाली आहे!आमचा बटाटेवडा...तुमचं सांबार,तर्री पोहे हा सुद्धा तसाच प्रकार,आणि मध्यप्रदेशातील पोहे आणि सांबारही प्रसिद्धच.फक्त उडीदवडा सांबार इतकेच मर्यादित न रहाता बटाटेवडा सांबारालाही तितकीच पसंती मिळाली आहे.एरवी बटाटे,कांदे,टोमॅटो,लसूण हे तर स्वयंपाक घराचे प्रधानमंडळ म्हणायला हवे.बटाटेवडा हा तमाम कष्टकरी वर्गाची भूक भागवणारा!पण हा सांबाराबरोबरही खातात हे मला खूपच उशीरा कळले.इकडून नाशिकला जाताना बरीच छोटी हॉटेल्स आहेत तिकडे बटाटेवडा सांबार हमखास मिळते.तसंच उडीदवडा-बटाटेवडा असेही कॉंबिनेशन मिळते.सगळेच एकदम यम्मी अँड टेस्टी टेस्टी😋यंदा भरपूर थंडी आहे.बटाटा तर कार्ब्ज चा मोठाच स्त्रोत आहे.त्याबरोबर भरपूर भाज्या घालून केलेले सांबारही प्रथिनांनी भरपूर असे.मस्त उकळून मुरलेले सांबार हे त्यामुळे बटाटेवडा सांबार असे चटकदार,थंडीला पळवून लावणारे...सगळयांचेच आवडते...चला तर या गरमागरम बटाटेवडा सांबार टेस्ट करायला,😋😋👍 Sushama Y. Kulkarni -
तुरीच्या डाळीचे मिक्स भाज्यांचे प्लेन सांबार (mix veg plain sambar recipe in marathi)
#GA4#week13#clue_tuvar#Tuvar_dal_sambarमाझ्या दोन्ही मुलांना भाज्या आवडत नसल्याने .... शोधलेली युक्ती...😀 भाज्या घालायच्या पण दिसणार नाहीत 😀😀 Monali Garud-Bhoite -
भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)
#HVकोहळा, शेंगा ,भेंडी, टोमॅटो ,कांदा घालून केलेला सांबार खूप, Charusheela Prabhu -
इडली सांबार चटणी (idli sambar chutney recipe in marathi)
#GA4# week 7Breakfast ब्रेकफास्ट थीम नुसार. इडली सांबार चटणी बनवीत आहे आज नाश्त्याला काय बनवावे हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला, मग मी खूप विचार केला मग एकदम माझ्या मनात विचार आला की चला आज इडली सांबार बनवूया जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली हलकी फुलकी असल्याने पचायला हलकी असते मी इडली,तांदूळ आणि उडीद डाळीचा आणि रव्याचा समावेश करून बनवली आहे.इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक उत्तम हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr इडली-सांबार म्हटले की लगेच दक्षिणात्य लोकांची डिश म्हणून प्रसिद्ध.. जरी ती दक्षिणात्य असली तरी आम्हा मुबंईकरांना आपलीशीच वाटते. तर मग करून बघूया 'इडली - सांबार ' Manisha Satish Dubal -
दही वडा (dahi wada recipe in marathi)
पुष्कळ दिवसापासून खायची इच्छा होती ती आज पूर्ण केली Maya Bawane Damai -
वडा सांबार शाॅट्स (wada sambhar shots recipe in marathi)
वडा सांबर नेहमी आपण खातो आवडत आपण पण त्याचं प्रेझेंटेशन आपण जरा छान ॲट्रॅक्टिव्ह केलं तर मुलांनाही खाण्याची इच्छा होते Deepali dake Kulkarni -
टु इन वन वडा वीद सांबार ॲड दही (vada sambhar recipe in marathi)
#GA4 #week 9#friedघरी पार्टी असेल अशि वेळी कमीत कमी वेळात दोन डीश तयार होतात ते ही झटपटचला तर मग बघूया टु इन वन वडा वीद सांबार ॲड दही . Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या