कॅरॅमल पॉपकॉर्न (caramel popcorn recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#Cooksnap छोटी छोटी भूख का करेंगे क्या ? आज माझ्या मुलाला पॉपकॉर्न खायचे होते. खाण्यात रोज काही ना काही व्हरायटी त्याला हव्या असतात. म्हणून पॉपकॉर्न मे कुछ ट्विस्ट मला करायचं होतं. तेव्हा आपली ऑथर सोनल कोल्हे ताई यांची कॅरॅमल पॉपकॉर्न रेसिपी मी बघितलेली होती. आणि ती करण्याचे ठरवले. नेहमी कॅरॅमल पॉपकॉर्न आम्ही मॉलमध्ये खायचो. पण आता लॉक डाऊन असल्याने हे पॉपकॉर्न खाण्याचा नो चान्स 😔 तेव्हा आता घरी बनविण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय घेतले की घरीच करून 😍 खूप छान यम्मी यम्मी झाले. माझ्या मुलाला आणि मला खूप आवडले. यम्मी कॅरॅमल पॉपकॉर्न खाल्ल्याने माझ्या मुलाचा टम्मी पण खुश झाला. या रेसिपीसाठी मी सोनल ताईचे धन्यवाद करते.🙏😍 आणि हो एक सांगायचं राहिलं मेन अपलोड फोटोतल डेकोरेशन माझ्या मुलाने केलेल आहे. मम्मा आपण असं ठेवू तसं ठेवू असं करून त्याने ते केलेलं. त्याला आणि मला दोघांनाही ही ऱेसीपी करताना मज्जा आली.😀👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 कपमक्याचे दाणे
  2. 1/2 कपसाखर
  3. 1 टेबल स्पूनबटर
  4. 1/2 टीस्पूनसोडा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पॉपकॉर्न मेकर मध्ये हाफ टेबलस्पून बटर टाकून घ्यावे. व त्यामध्ये मक्याचे दाणे टाकून पॉपकॉर्न तयार करून घ्यावेत.पॉपकॉर्न मेकर नसल्यास सोनल ताईंनी सांगितल्याप्रमाणे कुकरमध्ये सुद्धा तुम्ही पॉपकॉर्न तयार करू शकता.

  2. 2

    आता आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. येलो बटरमध्ये मध्ये मिठाचं प्रमाण असल्यामुळे मी यात मीठ घातलेलं नाही.

  3. 3

    आता पॉपकॉर्न मावतील एवढी कढई घ्यावी. त्या कढईत साखर मेल्ट करायला ठेवावी. ही प्रोसिजर जरा पटापट करावी लागते. साखरेला चम्मच हलवत राहावा लागतो. साखर मेल्ट झाली की त्यामध्ये बटर आणि सोडा टाकावा. ब्राऊन कलर आला की गॅस बंद करून द्यावा. साखर करपणार नाही याची काळजी घ्यावी.

  4. 4

    नंतर त्यामध्ये पॉपकॉर्न टाकून मिक्स करून घ्यावे. व एका प्लेटमध्ये थंड करून घ्यावेत.

  5. 5

    थंड झाल्यावर त्याला सेपरेट करून घ्यावे. आणि एका बाउल मध्ये सर्व्ह करावे.आणि मग टीव्हीवर आपली आवडती सीरियल किंवा पिक्चर बघता बघता कॅरॅमल पॉपकॉर्न चा आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes