सांडगी मिरची (sandgi mirchi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 18th week ,chili ह्या की वर्ड साठी पारंपारिक वाळवणीची सांडगी मिरची बनवली आहे.

सांडगी मिरची (sandgi mirchi recipe in marathi)

#goldenapron3 18th week ,chili ह्या की वर्ड साठी पारंपारिक वाळवणीची सांडगी मिरची बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०-१२ पोपटी मिरच्या
  2. 1/4 कपधणे
  3. 1 टेबलस्पूनजीरे
  4. 1/2 टीस्पूनमेथीदाणे
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. १/८ टीस्पून हिंग
  7. 2 टीस्पूनमीठ
  8. 1 टेबलस्पूनलिंबू रस/ व्हिनेगर
  9. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या केल्या.त्यांना मधोमध उभ्या चिर देऊन त्यातल्या बिया काढून टाकल्या.

  2. 2

    त्याला मीठ आणि व्हिनेगर घालून ७-८ तास झाकून ठेवल्या.त्याला पाणी सुटते ते फेकून दिले.

  3. 3

    आता मिरच्या मसाला भरण्यासाठी तयार आहेत.त्यासाठी साहित्य घेतले.

  4. 4

    धणे,जीरे, मेथीदाणे परतून घेतले.त्याची मिक्सरमधून पूड केली.

  5. 5

    तयार मसाल्या मध्ये हळद,मीठ हिंग आणि थोडे तेल घालून नीट मिक्स केले व मसाला मिरच्यांमध्ये नीट भरून घेतला.तेल घातल्याने मसाला मिरचीत नीट भरता येतो.बाहेर येत नाही.

  6. 6

    मसाला भरलेल्या सर्व मिरच्या उन्हात ४-५ दिवस वाळवून घेतल्या.वाळल्यानंतर त्यांचा रंग बदलतो.ह्या मिरच्या वर्षभर टिकतात.तळून वरण भात,दही भात यासोबत तोंडीलावणे म्हणून छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes