बालुशाही (balushahi recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#cooksnap
ही रेसिपी पुर्वा विसपुते ह्यांच्या रेसिपीज थोडा बदल करून बनवली आहे. धन्यवाद पुर्वा. ही मीझी १७५ वी रेसिपी आहे . म्हणून खास गोड रेसिपी.

बालुशाही (balushahi recipe in marathi)

#cooksnap
ही रेसिपी पुर्वा विसपुते ह्यांच्या रेसिपीज थोडा बदल करून बनवली आहे. धन्यवाद पुर्वा. ही मीझी १७५ वी रेसिपी आहे . म्हणून खास गोड रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ७५ ग्रॉम मैदा
  2. २५ ग्रॉम तुप
  3. २५ ग्रॉम दही
  4. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/4 टीस्पूनपीठी साखर
  6. २५ मीली पाणी
  7. 2 पींच मीठ
  8. 1/2 टीस्पूनलींबू रस
  9. १०० ग्रॉम साखर
  10. ५० मीली पाणी
  11. 1/2टी वेलचीपूड
  12. 6-7काढल्या केशर

कुकिंग सूचना

  1. 1

    मैदा, तुप, दही, मीठ, बेकिंग पावडर, साखर सर्व मीक्स करून ब्रेडक्रम्स सारखे करून मग पाणी घालून हलक्या हाताने गोळा केला. त्याला कणकेची सारखे मळायचे नाही.मग त्याचा तुकडा तोडून परत गोळ्यावर ठेवला. असे ५-६ वेळा केलं.मग १५ मिनिटे झाकून ठेवला.

  2. 2

    आता गॅसवर पॅनमध्ये साखर व पाणी घालून त्याला २-३ मी नीट उकळू दिले. मग त्यात थोडे दूध घालून त्याची मळी काढून घेतली. मग त्यात केशराचे पाणी व लींबू रस घालून पाक तयार होईपर्यंत उकळले. पाकाचा थेंब डीशवर टाकून तीरपे केल्यावर लगेच ओघळला नाही म्हणजे पाक तयार.

  3. 3

    आता झाकलेला गोळा घेऊन त्याला हाताने पुरी सारखे पसरवले. मग मधून कट करून एका वर एक ठेवले.परत हाताने अलगद थापले कट केले असे ६-७ वेळा केले व १० मिनिटे झाकून ठेवले.

  4. 4

    आता त्या गोळ्याचा रोल करून त्याचे पीसेस कट करून मग दोन्ही हातांच्या तळव्यांनी गोल गोल फिरवत चपटा गोल गोळा केला.

  5. 5

    सर्व गोळे तयार करून घेतले करतांना त्यांना मधे बोटाने होल केले. गॅसवर कढईत तूप गरम करून त्यात सर्व गोळे एकाच वेळी घातले कारण ह्याला तुपाचे तापमान कमी व एकसारखे लागते. २-३ मीनीटांनी ते गोळे वर येतात एका साईडने तळून झाल्यावर मग दुसऱ्या साईडने तळून घेतले. त्यांना झाऱ्याने हलवायचे नाही. त्या फार आरवार असतात.

  6. 6

    पाकात टाकल्यावर २-३ मी नीट ठेवून मग उलटवून परत एकदा २-३ मीठ ठेवून डीशमधे काढून वरून पीस्ता काप घालून सर्व्ह केले.

  7. 7

    ह्या बालुशाही एकदम खुसखुशीत होतात व पाक अगदी आतपर्यंत जातो. खुपच टेस्टी होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes