ब्रेड रोल (मिक्स भाज्यांचे)(Bread Roll Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#ब्रेड रोल लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ व करायलाही सोप्पा पण मी आज फक्त बटाट्याच्या सारणा ऐैवजी त्यात भाज्या घातल्या आहेत म्हणजे थोडी पोष्टीक रेसिपी तयार होईल व सगळ्यांच्या पोटात ह्या निमित्ताने भाज्या जातील चला तर रेसिपी बघुया

ब्रेड रोल (मिक्स भाज्यांचे)(Bread Roll Recipe In Marathi)

#ब्रेड रोल लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ व करायलाही सोप्पा पण मी आज फक्त बटाट्याच्या सारणा ऐैवजी त्यात भाज्या घातल्या आहेत म्हणजे थोडी पोष्टीक रेसिपी तयार होईल व सगळ्यांच्या पोटात ह्या निमित्ताने भाज्या जातील चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. 1कांदा बारीक चिरलेला
  2. 2-3उकडलेले बटाटे साल काढुन मॅश केलेले
  3. 2-3 टेबलस्पुनमटार
  4. 2-3 टेबलस्पुनबारीक चिरून उकडलेली फ्रेंच बिन्स
  5. 2-3मिरच्या
  6. 1/२ इंच आले
  7. 4-5लसुण पाकळ्या
  8. 1 टिस्पुनजीरे
  9. 1 टिस्पुनलाल तिखट
  10. 1/4 टिस्पुनहळद
  11. 1 टिस्पुनधने पावडर
  12. 1/२ टिस्पुन गरम मसाला
  13. 1 टिस्पुनआमचुर पावडर
  14. 1-2 टिस्पुनलिंबाचा रस
  15. चविनुसारमीठ
  16. २०० ग्रॅम तेल तळण्यासाठी
  17. ८-१० ब्रेडच्या स्लाइज

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    ब्रेडरोल बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य काढुन ठेवा. बटाटे उकडुन घ्या कांदा बारीक चिरून ठेवा. फ्रेंच बिन्स बारीक चिरून उकडून घ्या. मटार, आले, लसुण, मिरच्या, जीरे ह्यांची जाडसर पेस्ट करून ठेवा.

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जीरे व कांदा मिक्स करून परतुन घ्या नंतर त्यात मटार मिरचीची जाडसर पेस्ट व उकडलेली फ्रेंचाबीन्स टाकुन२ मिनिटे परतुन घ्या त्यातच हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर, आमचुर पावडर व थोड मीठ मिक्स करा व झाकण ठेवुन २ मिनिटे शिजवुन घ्या

  3. 3

    नंतर त्यात मॅश केलेले बटाटे मिक्स करून चांगले परतुन परत २-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा मधे मधे झाकण काढुन परतुन घ्या(खाली करपु नये म्हणुन) तयार भाजी थंड करायला ठेवा तसेच ब्रेडच्या स्लाइजच्या कडा सुरीने कापुन ठेवा. भाजीचे लहान लांबट रोल करून ठेवा

  4. 4

    प्लेटमध्ये थोड पाणी त्यात थोड मीठ मिक्स करून त्यात ऐक ब्रेडची स्लाइज दोन्ही बाजुने डिप करून लगेच हातावर ठेवुन हलक्या हाताने दाबुन जास्तीचे पाणी काढुन टाका त्यात भाजीचा रोल भरून ब्रेडच्या सर्व बाजु बंद करून रोल बनवा असे२-३ रोल रेडी करून गरम तेलात डिप फ्राय करा गोल्डन कुरकुरीत होईपर्यत अशा प्रकारे सर्व ब्रेड रोल रेडी करा

  5. 5

    गरमागरम कुरकुरीत ब्रेडरोल प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत केचप किंवा शेजवान चटणी, मायोनिज देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes